बंगालमध्ये साधूंना जमावाने केली मारहाण, उत्तर प्रदेशमधील साधू गंगासागरकडे निघाले होते; जाणून घ्या प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 11:22 AM2024-01-13T11:22:20+5:302024-01-13T11:25:29+5:30
उत्तर प्रदेशमधून बंगालमध्ये जाणाऱ्या साधूंना मारहाण झाल्याचे समोर आले आहे.
बंगालमध्ये साधूंना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातून पश्चिम बंगालमधील गंगासागर जत्रेला जात होते. यावेळी तीन साधूंना गुरुवारी संध्याकाळी जमावाने मारहाण केली. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून साधूंना मारहाण करण्यात आली. मकर संक्रांतीच्या सणासाठी गंगासागरला जाण्यासाठी साधूंसोबत आलेल्या एका व्यक्तीने आणि त्याच्या दोन मुलांनी वाहन भाड्याने घेतले होते. त्यांनी मार्गाची चौकशी करताच काही स्थानिकांना संशय आला. यानंतर संतप्त जमावाने त्यांच्यावर अपहरणाचा आरोप केला. त्यांनी साधूंना मारहाण केली.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स, चौकशीसाठी बोलावले; नेमकं प्रकरण काय?
मिळालेली माहिती अशी, यावेळी साधूंनी रस्त्यात असलेल्या तीन मुलींना मार्ग विचारला. यानंतर त्या मीलींनी घाबरून आरडाओरडा करून तेथून पळ काढला. हे पाहून स्थानिक लोकांनी साधूंला पकडून मारहाण केली. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये जमावान वाहनाची तोडफोड करताना दिसत आहेत.
प्रकरण वाढल्याने स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करून साधूंना वाचवले. पोलिसांनी त्यांना काशीपूर पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना पकडण्यासाठी छापेमारी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, साधूंचा रस्ता चुकला त्यामुळे त्यांनी दोन मुलींना रस्ता विचारला. यावेळी मुली घाबरल्या आणि पळून गेल्या, त्यामुळे साधू मुलींसोबत चुकीचे वागल्याचे स्थानिकांना संशय आला.