बिल्डर आत्महत्या: ३० कोटी रुपये कर्जाचे आमिष; ६८ लाखांना फसवल्यामुळे आत्महत्या

By राम शिनगारे | Published: September 23, 2022 09:45 PM2022-09-23T21:45:29+5:302022-09-23T21:45:43+5:30

जवाहरनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा. अनिल यांना काही बड्या व्यावसायिकांकडूनही त्रास होता. त्यांनीही पैशांसाठी तगादा लावला होता.

30 crore loan lure; Suicide due to cheating 68 lakhs | बिल्डर आत्महत्या: ३० कोटी रुपये कर्जाचे आमिष; ६८ लाखांना फसवल्यामुळे आत्महत्या

बिल्डर आत्महत्या: ३० कोटी रुपये कर्जाचे आमिष; ६८ लाखांना फसवल्यामुळे आत्महत्या

googlenewsNext

औरंगाबाद : नामांकित बांधकाम व्यावसायिक अनिल अग्रहारकर यांना एकाने ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून ६८ लाख रुपये घेतले. मात्र, कर्ज काही दिले नाहीत. त्याउलट घेतलेले पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनिल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद अनिल यांच्या भावाने जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून भागवत यशवंत चव्हाण (रा. प्लॉट नं. ४, शिवदत्त हौसिंग सोसायटी, एन ८, सिडको) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनिल अग्रहारकर यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणात मृताचे भाऊ दिलीप यांनी शुक्रवारी तक्रार दिली. या तक्रारीनुसार अनिल यांच्या डायरीमधील नोंदीनुसार ‘आरोपी भागवत चव्हाण ३० कोटी रुपयांचे लोन देणार होता. त्यासाठी आरटीजीएस आणि रोख स्वरुपात ६८ लाख रुपये त्याने घेतले. आरोपीने पैसे घेऊनही कर्ज मिळवून दिले नाही, त्यामुळे अडचणीत आलो आहे. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे,’ असे नमूद केले होते. ९ महिन्यांपासून अनिल हे बँकेतून कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याचवेळी त्यांची अक्षय सलामे (रा. पैठणरोड) आणि महेश गाडेकर (रा. येवला, जि. नाशिक) यांनी भागवत चव्हाण याच्याशी ओळख करून दिली होती. चव्हाण यांनी ३० कोटी रुपये कर्ज मंजूर करून देतो, त्यासाठी ७० लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यानुसार अनिल यांनी ६८ लाख रुपये दिले होते. चार दिवसांपूर्वी भागवत चव्हाण हे अनिल यांच्या घरी आले होते. त्यांनी दुसऱ्याच दिवशी ३ कोटी रुपये रोख आणि ६ कोटी रुपये आरटीजीएसद्वारे देतो, असे स्पष्ट केले होते; परंतु त्याने ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत. त्याच दिवशी चव्हाण यांनी अनिल यांना इचलकरंजी बँकेच्या व्यवस्थापकांना भेटीस घेऊन गेले.

त्याठिकाणी त्यांनी अनिल यांना ३० कोटी रुपये कर्ज देणार आहे, तोपर्यंत त्यांच्यावर कार्यवाही करू नका, असे सांगितल्याचेही फिर्यादीत म्हटले. निरीक्षक पाटील यांच्या आदेशाने सपोनि दिलीप चंदन यांनी गुन्हा नोंद करत अधिक तपासासाठी सपोनि सुधीर वाघ यांच्याकडे दिला.

मोठी नावे चौकशीत समोर येणार
अनिल यांना काही बड्या व्यावसायिकांकडूनही त्रास होता. त्यांनीही पैशांसाठी तगादा लावला होता. त्यांची नावे पोलीस तपासात समोर येतील तसेच अनिल यांच्या मोबाईलच्या सीडीआरवरून त्यांच्या संपर्कात कोण कोण होते, त्यांना कोण त्रास देत होते, याचाही तपास होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: 30 crore loan lure; Suicide due to cheating 68 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.