करुणा मुंडे यांना ३० लाखाला गंडा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 11:01 AM2022-08-27T11:01:09+5:302022-08-27T11:07:07+5:30

Karuna Munde : एका कंपनीत तीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला महिन्याला ४५ ते ७० हजार रुपये परतावा देऊ असे आमिष दाखवले.

30 lakh to Karuna Munde; Filed a case in the police station | करुणा मुंडे यांना ३० लाखाला गंडा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

करुणा मुंडे यांना ३० लाखाला गंडा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

googlenewsNext

- शेखर पानसरे 

संगमनेर ( जि. अहमदनगर) : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांची तीस लाखांची आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणी  संगमनेर शहर पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

एका कंपनीत तीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला महिन्याला ४५ ते ७० हजार रुपये परतावा देऊ असे आमिष दाखवले. करुणा मुंडे यांनी दहा दिवसात वरील रक्कम रोकड व चेक स्वरुपात दिली.  त्यांना एकदाच ४५ हजाराचा परतावा दिला. 

त्यानंतर करुणा मुंडे यांनी संबंधितांकडे पैशांबाबत विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे मिळाली, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली असे करुणा मुंडे यांनी फिर्यादित म्हटले आहे.

Web Title: 30 lakh to Karuna Munde; Filed a case in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.