भिवंडीत ३२ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, भोईवाडा पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 07:20 PM2021-10-27T19:20:31+5:302021-10-30T17:34:24+5:30
चार लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी दोघांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे .
भिवंडी- भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा वाहतूक होंबार असल्याची खबर पोलिसांना लागताच मंगळवारी रात्रीच्या सुमारास भोईवाडा पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळी पथके तयार करून धामणकरनाका, भंडारी कम्पौड, कारीवली रोड येथे नाकाबंदी लावुन संशयित वाहनांची तपासणी केली असता धामणकरनाका भिवंडी येथे एक महिंद्रा पिकअप टेम्पो हा भरधाव वेगाने येत असल्याचे दिसल्याने या पिकअप टेम्पो अडवुन टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोच्या कॅबीनच्या टपावर बनविण्यात आलेल्या करीअर बॉक्समध्ये १५ पॅकेट मध्ये ३२ किलो ५३७ ग्रॅम वजनाचा गांजा मिळुन आला असून पीक अप टेम्पोसह दोन मोबाईल असा चार लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी दोघांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे .
रहीम करीम शेख ( वय २९ वर्षे, रा खाडीपार ) व सलीम फकीर मोहम्मद अन्सारी, ( वय ४५ वर्षे रा . खाडीपार ) असे गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपींची नवे आहेत . तपासणीदरम्यान त्यांच्याकडून ३२ किलो ५३७ ग्रॅम गांजा, पिकअप टेम्पो व दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ४ लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल भिवाद पोलिसांनी हस्तगत केला आहे .