ईडीएएल कंपनीकडून एसीबीआय बँकेला ३३८ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 03:06 AM2020-09-15T03:06:53+5:302020-09-15T03:07:28+5:30

कंपनीचे कार्यालय व त्यांच्या निवासस्थानी छापे मारून महत्त्वपूर्ण ऐवज जप्त केला.

338 crore bribe from EDAL to ACBI Bank | ईडीएएल कंपनीकडून एसीबीआय बँकेला ३३८ कोटींचा गंडा

ईडीएएल कंपनीकडून एसीबीआय बँकेला ३३८ कोटींचा गंडा

Next

मुंबई : बनावट कागदपत्रे व दस्तऐवज सादर करून एका खासगी कंपनीने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या (एसबीआय) येथील शाखेची तब्बल ३३८ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इ डी अ‍ॅल्युमिनियम लिमिटेड असे तिचे नाव असून केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने कंपनीचे अध्यक्ष सुदीप दत्ता व अन्य संचालकांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला.
कंपनीचे कार्यालय व त्यांच्या निवासस्थानी छापे मारून महत्त्वपूर्ण ऐवज जप्त केला. कांदिवली येथे मुख्यालय असलेल्या ईडीएएल ही कंपनी अ‍ॅल्युमिनियम फॉईल व रासायनिक औषधांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. तिचे सीईओ दत्ता व इतरांनी संगनमत करून एसीबीआय बँकेत बनावट कागदपत्रे, दस्तऐवज सादर करून ३३८ कोटी ५२ लाख कर्ज उचलले. त्यानंतर ही रक्कम अन्य बोगस कंपनी व खात्यावर वर्ग केली.

आॅडिटमध्ये बाब स्पष्ट
बँकेने केलेल्या आॅडिटमध्ये ही बाब स्पष्ट झाल्यानंतर सीबीआयने अध्यक्ष दत्ता तसेच संचालक दीपक भट्टाचार्य, गौतम मुखर्जी, आदींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: 338 crore bribe from EDAL to ACBI Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई