इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 08:05 PM2020-09-14T20:05:49+5:302020-09-14T20:10:03+5:30
अध्यक्ष दत्ता व संचालकाविरुद्ध गुन्हा, सीबीआयचे कार्यालय व निवासस्थानी छापे
मुंबई- बनावट कागदपत्रे सादर करून एका खासगी कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) येथील शाखेला तब्बल 338 कोटी 52 लाख रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इस्स डी अल्युमिनियम लिमिटेड (इडीएल ) असे तिचे नाव असून केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने (सीबीआय ) कंपनीचे अध्यक्ष सुदीप दत्ता व अन्य संचालकाविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला. कंपनीचे कार्यालय व त्यांच्या निवासस्थानी छापे टाकून महत्वपूर्ण ऐवज जप्त केला.
कांदिवली येथे मुख्यालय असलेल्या इडीएएल ही कंपनी अल्युमिनियम फॉईल व रासायनिक औषधाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचे सीईओ दत्ता व इतरांनी संगनमत करून एसीबीआय बँकेत बनावट कागदपत्रे, दस्ताऐवज सादर करून 338 कोटी 52 लाख कर्ज उचलले. त्यानंतर ही रक्कम अन्य बोगस कंपनी व खात्यावर वर्ग केली. बँकेने केलेल्या ऑडिटमध्ये ही बाब स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी त्याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार सीबीआयने अध्यक्ष दत्ता तसेच संचालक दीपक भट्टाचार्य, गौतम मुखर्जी, मनोज जैन आदीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी कंपनीचे कार्यालय व आरोपीच्या निवासस्थानी छापे टाकून महत्वपूर्ण दस्ताऐवज जप्त केला असून झडतीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या
दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक
‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."
पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप
रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं
उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे