मीरारोडमधून ४ बांगलादेशी अटकेत, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 09:08 PM2022-07-25T21:08:28+5:302022-07-25T21:09:12+5:30
Bangladeshi Arrested : परिसरात काम करणाऱ्या ४ बांग्लादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मीरारोड - मीरारोडमध्ये अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या ४ बांग्लादेशींना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली आहे .
कक्षाचे निरीक्षक देविदास हांडोरे सह उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, केशव शिंदे, सुप्रिया तिवले व सम्राट गावडे यांच्या पथकाने मिळालेल्या माहिती नुसार मीरारोडच्या शांती नगरमध्ये सापळा रचला. त्या परिसरात काम करणाऱ्या ४ बांग्लादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीनंतर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मीरा भाईंदरमध्ये घरकामपासून मजुरी वा मिळेल ते काम करणारे अनेक बांगलादेशी नागरिक देशात बेकायदा वास्तव्य करून आहेत . अनेकांना पोलिसांनीअटक करून गुन्हे दाखल केले आहेत. परंतु बांग्लादेशींना आश्रय , काम देणाऱ्या लोकांवर मात्र कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .