एकाच कुटुंबातील ४ मृतदेह संशयास्पद आढळले; अमेरिकेत जाण्यासाठी खर्च केले ७५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 03:01 PM2022-01-29T15:01:30+5:302022-01-29T15:01:47+5:30
गुरुवारी कॅनडा-अमेरिकेच्या सीमेवर चार लोकांचा मृतदेह सापडले. पोलिसांच्या माहितीनुसार, या मृतदेहांमध्ये २ वयस्क आणि २ मुलं होती.
अमेरिका-कॅनडाच्या सीमेवर झालेल्या गुजराती कुटुंबाच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ माजली आहे. कॅनडा पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले आहेत ज्यामुळे शोध लावणं आव्हानात्मक झालं आहे. या कुटुंबाने अमेरिकेला पोहचण्यासाठी ७५ लाख का खर्च केले? या प्रश्न पोलिसांना पडला आहे. इतकी मोठी रक्कम खर्च का करावी लागली असं काय घडलं? याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, मानवी तस्काराचं हे प्रकरण वाटत आहे.
गुजराती कुटुंब टूरिस्ट व्हिसाच्या आधारे कॅनडा पोहचले तर सीमा पार करुन अमेरिकेला का जायचं होतं? अमेरिकेत गुजराती आणि पटेल समुदायाचं नेटवर्क चांगले आहे. जवळपास दीड लाखाहून अधिक पटेल तिथं राहतात. अधिकाऱ्यांच्या मते, कडाक्याची थंडीचा सामना करण्यासाठी कुटुंबाकडे चांगली व्यवस्था होती. कदाचित तस्करांनी एकसारखं दिसणारे कपडे दिले होते. ज्या लोकांना या वातावरणाची सवय आहे त्यांच्यासाठीही यंदाची थंडी खूप जास्त होती. थंडीचा कहर आधीच्या तुलनेने जास्त आहे. या कुटुंबाच्या ४ सदस्यांचे मृतदेह सापडण्यापूर्वी १६ तास खूप भीषण थंडीत राहिले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुरुवारी कॅनडा-अमेरिकेच्या सीमेवर चार लोकांचा मृतदेह सापडले. पोलिसांच्या माहितीनुसार, या मृतदेहांमध्ये २ वयस्क आणि २ मुलं होती. सापडलेले मृतदेह एकाच कुटुंबाचे असून ते मूळचे गुजरातमधील असल्याचं समोर आलं. या चौघांचा मृत्यू कडाक्याच्या थंडीमुळे झाल्याचा अंदाज आहे. भारतीय दुतावासाने हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. सुरुवातीच्या चौकशीत मानवी तस्कराचाही संशयही पोलिसांना वाटत आहे.
पोलीस असा संशय व्यक्त करत आहेत की, मानवी तस्कराने या चारही लोकांना याठिकाणी आणले. मात्र भीषण थंडी असल्याने त्यांचा मृत्यू झाला. सूत्रांच्या मते, १९ जानेवारीला यूएस कॅनडाच्या सीमेजवळ अमेरिकन अधिकाऱ्यांना अशा लोकांचा एक समूह सापडला जो बेकायदेशीरपणे कुठलीही कागदपत्रे नसताना अमेरिकेच्या सीमेत प्रवेश करत होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर कॅनडा पोलिसांनी ४ जणांचा शोध सुरु केला. तेव्हा सीमेजवळ या चौघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले.