बजेटच्या आदल्या रात्री रुपयेच रुपये...! राजस्थान-गुजरातच्या सीमेवर पोलिसांना हवालाचे घबाड सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 03:29 PM2023-02-01T15:29:28+5:302023-02-01T15:29:42+5:30

सिरोही पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ३ कोटी ९५ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. 

4 crore rupees of hawala seized from car night before the budget on Rajasthan-Gujarat border | बजेटच्या आदल्या रात्री रुपयेच रुपये...! राजस्थान-गुजरातच्या सीमेवर पोलिसांना हवालाचे घबाड सापडले

बजेटच्या आदल्या रात्री रुपयेच रुपये...! राजस्थान-गुजरातच्या सीमेवर पोलिसांना हवालाचे घबाड सापडले

googlenewsNext

राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात पुन्हा एकदा गुजरातच्या बॉर्डरवर एका कारमधून तब्बल चार कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सिरोही पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ३ कोटी ९५ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. 

ही रोख रक्कम राजस्थानच्या जयपूरमधून गुजरातला नेण्यात येत होती. या रकमेबाबत आरोपी योग्य उत्तर देऊ शकले नाहीत. यामुळे पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे. ही हवाल्याची रक्कम असल्याचे पोलिसांनी सांगितले. सिरोहीमध्ये यापूर्वीही अनेकदा अशा मोठ्या रकमा जप्त करण्यात आल्या आहेत. 

माऊंट अबू पोलीस उपअधिक्षक योगेश शर्मा यांनी सांगितले की, रीको आबूरोडचे पोलीसांनी ही रक्कम पकडली आहे. मंगळवारी पोलिसांना याची टीप लागली होती. यामुळे पोलिसांनी मावळ चौकीच्या समोरच नाकेबंदी केली होती. यावेळी एका कारला थांबविण्यात आले. तपासणीवेळी या कारमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली. ही रक्कम प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आली होती. 

दोघांकडून समाधानकारक उत्तर न आल्याने नोटा मोजण्याचे मशिन मोजण्यात आले. ती 3 कोटी 95 लाख रुपये निघाली. पोलिसांनी सध्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी रोख रक्कम आणि कार जप्त केली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गुजरातमधील पाटण येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: 4 crore rupees of hawala seized from car night before the budget on Rajasthan-Gujarat border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.