तस्करांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग, एनसीबीने पकडला ४ कोटीचा गांजा

By राजेश भोस्तेकर | Published: September 2, 2022 05:33 PM2022-09-02T17:33:48+5:302022-09-02T17:35:38+5:30

खोपोली येथील कारवाईत एकास अटक

4 Crore worth of ganja was caught by NCB after a filmy style chase in khopoli raigad | तस्करांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग, एनसीबीने पकडला ४ कोटीचा गांजा

तस्करांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग, एनसीबीने पकडला ४ कोटीचा गांजा

googlenewsNext

अलिबाग (राजेश भोस्तेकर) : मुंबईच्या विविध उपनगरात वितरण करण्यासाठी आणलेला २१० किलो गांजासह एका व्यक्तीस खोपोली येथे एनसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वाहनासह अटक केली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा मुंबईचा रहिवासी आहे. हस्तगत केलेल्या गांजाची बाजारात ४ कोटी इतकी किंमत आहे. मुंबई एनसीबीने आंतरराज्यीय अंमली पदार्थाच्या तस्करीला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आंध्र प्रदेश ओडिशा भागातून हा गांजा आणण्यात आला होता. गुरुवारी १ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती.

मुंबई मध्ये अंमली पदार्थ असलेल्या गांजाला मोठी मागणी वाढली आहे. अंमली पदार्थाच्या या विळख्यात तरुणाई अडकत चालली आहे. यासाठी एनसीबी विभागाकडून अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यावर आपली करडी नजर ठेवली आहे. एन सी बी ने आपल्या गुप्तहेर यांनीही अमली पदार्थ तस्करी बाबत सतर्क राहण्याचे सांगितले होते. त्यानुसार गुप्तहेर याच्याकडून आंध्र प्रदेश ओडिसा येथून पुणे शहरात काही ठिकाणी वितरण केल्यानंतर गोवंडी, मुंबईमध्ये गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई एनसीबी पथकाला लागली होती.

गुप्तहेर याच्या मिळालेल्या माहितीनुसार एनसीबी भरारी पथकाने मुंबई पुणे महामार्गावर मुंबई कडे येणाऱ्या मार्गावर सापळा रचला होता. गुप्तहेर याने सागितलेल्या माहितीनुसार वाहन दिसले असता पथकाने वाहनाचा पाठलाग सुरू केला. मात्र वाहनाचा चालक हा अनुभवी तस्कर असल्याने आणि आपला पाठलाग होत असल्याचे पाहून एनसीबीला चकमा देऊन खोपोली मार्गाकडे गेला. पथकाने ही चतुराई दाखवून फिल्मी स्टाईलने पाठलाग करून चालकावर झडप घातली. वाहन थांबवून चालकाची चौकशी आणि वाहन तपासणी केली असता तो समाधान कारक उत्तरे देत नव्हता. अखेर वाहनाची कसून झडती केली असता तपकिरी चिकट टेपने सीलबंद केलेली 98 पॅकेट्स सापडली. ज्यात २१० किलो वजनाचा ४ कोटीचा गांजा होता. आरोपीची सखून चौकशी केली असता आधीच्या अमली पदार्थ गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निदर्शनात आले. 

मुंबईतील स्थानिक पॅडलर्सना गांजाचा तातडीचा ​​पुरवठा करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मुख्य पुरवठादाराकडून त्याने हे औषध पुण्यातून आणले होते. अटक करण्यात आलेला आरोपी हा अनुभवी तस्कर आहे आणि गेल्या 4-5 वर्षांपासून अवैध अंमली पदार्थांच्या तस्करी व्यवसायात आहे आणि अंमली पदार्थांच्या चळवळीसाठी अनेक आंतरराज्य वाहतूक सहलींमध्ये त्याचा सहभाग होता. तो एजन्सीच्या रडारमध्ये होता आणि अशा हालचालींदरम्यान वारंवार मोबाइल फोन बदलणे आणि इतर डावपेचांमुळे तो पळून जात होता.

गांजा लागवडीचे केंद्र असलेल्या आंध्र प्रदेश-ओडिशा भागातून ही औषधे आणली जात होती. हा प्रतिबंध मुंबई आणि लगतच्या अनेक स्थानिक पेडलर्सना डिलिव्हरी करण्यासाठी होता. एन सी बी कडून अधिक तपास केला जात आहे आणि या व्यक्तीची सिंडिकेटमधील इतर सहयोगी, इतर प्रतिबंधित वस्तूंचा साठा आणि पुरवठा संबंध, स्थानिक व्यापार्‍यांचा तपशील आणि भारतातील विविध राज्यांमध्ये पसरलेल्या इतर अंमली पदार्थांशी संबंधित सबधाबद्दल चौकशी केली जात आहे.

Web Title: 4 Crore worth of ganja was caught by NCB after a filmy style chase in khopoli raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.