4 लाख 68 हजारांचा बेकायदेशीर गुटखा जप्त; दादर सागरी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 09:40 PM2021-12-07T21:40:06+5:302021-12-07T21:40:21+5:30
4 lakh 68 thousand illegal gutka seized : चार लाख 68 हजार रुपयांचा गुटखा पाेलिसांनी हस्तगत केला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, दादर सागरी पोलिसांना गुटखा तस्करी बाबत गुप्त माहिती मिळाली होती.
नरेश पवार
वडखळ ः बेकायदेशीरपणे गुटख्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला दादर सागरी पोलिसांनी मुद्देमालासह रंगेहाथ पकडले. चार लाख 68 हजार रुपयांचा गुटखा पाेलिसांनी हस्तगत केला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, दादर सागरी पोलिसांना गुटखा तस्करी बाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. आर. भौड, हवालदार प्रकाश कोकरे, प्रविण खाडे, मनिष म्हात्रे यांनी सापळा रचला.
दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारपाडा चौकी जवळ आयशर गाडीतून प्रतिबंधित केलेला विमल गुटख्या ची वाहतूक करताना आरोपी विपुल विलास चिपळ रा. मु. काटेड, ता.जुन्नर जि. पुणे याला ताब्यात घेतले. बंदी असलेल्या अवैध गुटख्याची विक्री व वाहतूक केल्या प्रकरणी दादर सागरी पोलिसांनी आयशर टेम्पो सह आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी पावती देखील बनवली होती. या गुन्ह्यात 4 लाख 68 हजार किमतीचा गुटखा आणि आयशर टेम्पो आसा एकूण 21 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दादर सागरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.