सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली होती ४ लाखांची रायफल, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनेही पोलिसांकडे केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 04:19 PM2022-07-12T16:19:02+5:302022-07-12T16:39:40+5:30

Salman Khan : हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील बिश्नोई समाजाला काळवीट प्रिय असल्याने काळवीटच्‍या शिकारीमुळे तो सलमान खानवर संतप्त होता, असे तो पुढे म्हणाला.

4 lakh rifle bought to kill Salman Khan, gangster Lawrence Bishnoi also revealed to police | सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली होती ४ लाखांची रायफल, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनेही पोलिसांकडे केला खुलासा

सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली होती ४ लाखांची रायफल, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनेही पोलिसांकडे केला खुलासा

googlenewsNext

नवी दिल्ली : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने २०१८ मध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या "हत्येसाठी" सर्व तयारी केल्याचा खुलासा केला आहे. यासाठी त्याने एक खास रायफलही खरेदी केली होती, ज्यासाठी त्याने 4 लाख रुपये खर्च केले होते. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याआधी दिल्ली पोलिसांनी त्याची चौकशी केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनी न्यूज18ला सांगितले की, लॉरेन्सने सलमानला मारण्याचे कारणही सांगितले. हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील बिश्नोई समाजाला काळवीट प्रिय असल्याने काळवीटच्‍या शिकारीमुळे तो सलमान खानवर संतप्त होता, असे तो पुढे म्हणाला.

१९९८ मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानवर काळवीट शिकार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. दोन काळवीटांची हत्या केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाने सलमानला एप्रिल 2018 मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला सलमानने वरच्या न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणात सलमानला काही काळ जोधपूर तुरुंगातही राहावे लागले होते. नंतर त्याला भरतपूर कारागृहात हलवण्यात आले.

लॉरेन्स बिश्नोईने पोलिस चौकशीत कबूल केले की, त्याने राजगढमधील रहिवासी संपत नेहराला सलमान खानला मारण्यासाठी मेसेज पाठवले होते. त्यावेळी नेहरा फरार होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्सने सांगितले की, सलमानला मारण्यासाठी संपत नेहराला मुंबईत पाठवले होते. त्याने अभिनेत्याच्या घराभोवती रेकीही केली. पण नेहराकडे एकच पिस्तूल होते. त्याच्याकडे लांबचं लक्ष्य हेरणारी  रायफल नव्हती. यामुळे तो सलमानवर हल्ला करू शकला नाही.

लॉरेन्सने पोलिसांना सांगितले की, त्यानंतरच त्याने आरके स्प्रिंग रायफल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. लॉरेन्सच्या म्हणण्यानुसार, त्याने दिनेश डागर नावाच्या व्यक्तीला ही रायफल खरेदी करण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी चार लाख रुपयेही भरण्यात आले. हे पैसे डागरचे भागीदार अनिल पांडे यांना देण्यात आले. मात्र, २०१८ मध्ये डागरच्या ताब्यातून ही रायफल पोलिसांनी जप्त केली होती.

लॉरेन्स बिश्नोई बराच काळ सलमान खानच्या मागे लागला आहे. गेल्या महिन्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीतील तीन जणांनी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना पत्राद्वारे धमकी दिल्याचे वृत्त आले होते. सिद्धू यांची 29 मे रोजी पंजाबमधील मानसा येथे अंदाधुंद गोळीबार करून हत्या करण्यात आली होती.

Web Title: 4 lakh rifle bought to kill Salman Khan, gangster Lawrence Bishnoi also revealed to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.