भयानक! ४ पुरुषांनी झोपेच्या गोळ्या देऊन स्वत:च्या पत्नींची केली अदलाबदल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 06:41 PM2022-11-04T18:41:32+5:302022-11-04T18:41:55+5:30

सध्या कोर्टाने या ४ पुरुषांना दोषी ठरवलं आहे. सर्वांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतला असून पुढील वर्षी दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

4 men swapped their wives with sleeping pills at Singapore | भयानक! ४ पुरुषांनी झोपेच्या गोळ्या देऊन स्वत:च्या पत्नींची केली अदलाबदल अन्...

भयानक! ४ पुरुषांनी झोपेच्या गोळ्या देऊन स्वत:च्या पत्नींची केली अदलाबदल अन्...

googlenewsNext

पती-पत्नी या दोघांमधील नाते विश्वासावर टिकते. नात्यांमधील विश्वास तुटला तर नातेही तुटायला वेळ लागत नाही. सिंगापूरात घडलेल्या एका घटनेने पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला आहे. याठिकाणी ४ पुरुषांनी स्वत:च्या पत्नींची अदलाबदल करत फसवणूक केल्याचं उघड झाले आहे. हे चौघेही ऑनलाईन माध्यमातून एकमेकांना भेटले होते. आता चौघांवर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सध्या कोर्टाने या ४ पुरुषांना दोषी ठरवलं आहे. सर्वांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतला असून पुढील वर्षी दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. डेलीस्टारच्या माहितीनुसार, या चारही आरोपी पतींनी Dormicum ही झोपेची गोळी देऊन पत्नींची अदलाबदल करत शारिरीक संबंध बनवले. या घटनेत आणखी ३ जणांना आरोपी बनवण्यात आले होते. 

आरोपींनी केवळ शारिरीक संबंध ठेवले नाही तर ज्यावेळी महिला नशेत होत्या तेव्हा त्यांचा व्हिडिओही रेकॉर्ड केला. चारही पतींकडून हा प्रकार वारंवार सुरू होता. याप्रकरणी आरोपींची ओळख उघड करण्यात आली नाही कारण त्यांच्यामुळे पत्नीची ओळख जाहीर होऊ शकते. सुनावणीवेळी आरोपींना K45, L53, M45, N37 या कोड नावानं संबोधित करण्यात येत होते. रिपोर्टनुसार, K आणि M १९ ते २३ वर्ष शिक्षा सुनावली जाऊ शकते. N ला १७ ते २१ वर्ष जेलमध्ये राहावं लागेल. तर L ला ११ ते १६.५ वर्ष जेलमध्ये शिक्षा भोगावी लागू शकते. 

सिंगापूर स्थानिक माध्यमांनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी ४१ वर्षीय J लाही शिक्षा सुनावली जाणार आहे. सध्या या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा तपास सुरू आहे. महिलांना २०१० ते २०१८ या कालवधीत शोषणाचं शिकार बनवण्यात आले. हे सर्व आरोपी सेमीबॉय वर भेटले होते. J नावाचा व्यक्ती पुरुषांना ड्रग्स देत होता. त्यानेच पुरुषांना झोपेच्या गोळ्या उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. 

कसं झालं वाईफ स्वॅपिंग?
J च्या पत्नीने सर्वात आधी पतीच्या मोबाईलवर काही फोटो पाहिले. J ने K सोबत वाईफ स्वॅपिंगवर संवाद साधला. तो M ने सॅक्सुअल एक्टिविटी लाईव्हस्ट्रीम करत व्हिडिओ बनवला. P ने L च्या पत्नीला झोपेची गोळी देत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला जाग आली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. 
 

Web Title: 4 men swapped their wives with sleeping pills at Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.