व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवकासह 4 जणांना अटक

By दीपक शिंदे | Published: September 26, 2023 10:21 AM2023-09-26T10:21:02+5:302023-09-26T10:21:23+5:30

रात्री एक वाजता व्हेल माशाचे तसकरीचा मुद्देमाल मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून जप्त करण्यात आला आहे.

4 persons including ex-Corporator of Mahabaleshwar arrested in case of reverse smuggling of whale fish | व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवकासह 4 जणांना अटक

व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवकासह 4 जणांना अटक

googlenewsNext

महाबळेश्वर - महाबळेश्वरचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह तीन जणा विरोधात व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी वन विभागाकडुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्या सह संतोष खुशालचंद्र जैन राहणार निसर्ग विहार रत्नागिरी, संजय जयराम सुर्वे रा. मेढा ता. जावळी, अनिल अर्जुन ओंबळे. रा. बोंडारवाडी ता. जावळी, जि. सातारा असे एकूण चार जणांना व्हेलं माशाच्या तस्करी प्रकरणी सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर महांगडे यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

रात्री एक वाजता व्हेल माशाचे तसकरीचा मुद्देमाल मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात महाबळेश्वरच्या माजी नगरसेवक प्रकाश रामचंद्र पाटील याच्यासह एकूण चार जण अटक करण्यात आली आहे. त्यांना आज दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

Web Title: 4 persons including ex-Corporator of Mahabaleshwar arrested in case of reverse smuggling of whale fish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.