4 तरुणींचा तरुणावर बलात्कार; अपहरण करुन दारू पाजली, हात-पाय बांधले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 08:27 PM2022-11-22T20:27:43+5:302022-11-22T20:28:48+5:30

पंजाबच्या जालंधरमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, तरुणाने अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.

4 women rape a man; Kidnapped him, make him drunk, tied hands and feet and raped him | 4 तरुणींचा तरुणावर बलात्कार; अपहरण करुन दारू पाजली, हात-पाय बांधले अन्...

4 तरुणींचा तरुणावर बलात्कार; अपहरण करुन दारू पाजली, हात-पाय बांधले अन्...

Next

जालंधर:पंजाबच्या जालंधरमधून अपहरण आणि लैंगिक छळाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जालंधरमधील एका चामड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तीने दावाय की, चार तरुणींनी दारू पाजून त्याच्यावर बलात्कार केला आहे. तसेच, तरुणींनी हात बांधून गाडीतून अपहरण केल्याचेही त्याने सांगितले. अद्याप याप्रकरणी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केलेली नाही.

या व्यक्तीने सांगितले की, तो जालंधरच्या कपूरथला रोडवर असलेल्या एका लेदर फॅक्टरीत काम करतो. तो घरी जात होता, यादरम्यान एक पांढऱ्या रंगाची कार त्याच्याजवळ येऊन थांबली. त्यात 4 मुली बसल्या होत्या, त्यांनी डोळ्यात कुठलातरी पदार्थ घातला आणि गाडीत ओढले. मुलींनी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली, हात बांधले आणि दारू पाजली.

चारही मुली दारूच्या नशेत असल्याचे तरुणाने सांगितले. त्यांनी त्याला अज्ञात ठिकाणी नेले आणि त्यालाही जबरदस्तीने दारू पाजली. यानंतर तो दारूच्या नशेत असताना तरुणींनी त्याच्यावर अतिप्रसंग केला. सर्वकाही झाल्यानंतर गाडीतून त्याला परत फॅक्टरीसमोर सोडले आणि पळ काढला. चेहऱ्यावरुन तरुणी चांगल्या घरातील असल्याचेही त्या तरुणाने सांगितले आहे. अद्याप याप्रकरणी त्याने तक्रार दाख केलेली नाही. तरुणाकडून माहिती घेऊन गुप्तचर विभाग तपास करत आहे.

Web Title: 4 women rape a man; Kidnapped him, make him drunk, tied hands and feet and raped him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.