क्रौर्याची परिसीमा ; चार वर्षांच्या चिमुरडीचा जन्मदात्या आईकडून जमिनीवर डोके आपटून खून,पिंपळे गुरव येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 23:52 IST2020-07-27T23:48:50+5:302020-07-27T23:52:03+5:30
घरातले दशक्रिया विधीला गेले होते, त्याचवेळी मुलीचा त्रास सहन होत नसल्याने हे कृत्य केल्याची कबुली.

क्रौर्याची परिसीमा ; चार वर्षांच्या चिमुरडीचा जन्मदात्या आईकडून जमिनीवर डोके आपटून खून,पिंपळे गुरव येथील घटना
पिंपरी : चार वर्षांच्या मुलीचा त्रास सहन न झाल्याने आईने मुलीचे डोके जमिनीवर आपटले. आणि मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळुन मुलीला संपवले. हा धक्कादायक प्रकार पिंपळेगुरव येथे सकाळी अकराच्या सुमारास घडला आहे. मुलीच्या त्रासामुळे आईकडून रागाच्या भरात झालेला खुन या यामुळे परिसरातील नागरिक याप्रकारच्या अमानुष कृत्याने धास्तावले आहेत.
सविता दीपक काकडे (वय २२, रा. भालेकर नगर, पिंपळे गुरव, सांगवी) या कूर कृत्य करणा-या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर रिया दीपक काकडे (वय ४) असे या घटनेत मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक काकडे यांच्या आईचे निधन झाले असून त्यांच्या दशक्रिया विधीसाठी काकडे कुटुंबीय सोमवारी सकाळी आळंदी येथे गेले होते. बाराच्या सुमारास काकडे कुटुंबीय घरी परतले, तेव्हा रिया निपचित पडली होती. ती खूप त्रास देत असल्याने तिला मारून टाकले असे सविता हिने कुटूंबियांना सांगितल्या नंतर सर्वांची बोबडीच वळली. कुटुंबीयांनी धावपळ करीत तिला वैद्यकीय उपचार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रिया त्रास देत असल्याने तिच्या आईने तिचे डोके जमिनीवर आपटले. त्यानंतर मोबाईल चार्जर च्या वायरने तिचा गळा आवळला. रिया हिच्या कवटी चा पूर्णत: चुरा झाला असून, सविताने हे कृत्य केले कसे याचाही शोध घेतला जात आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना सविताचा सहा महिन्यांचा मुलगा घरातच होता. तिने हे कृत्य केल्यानंतर कुटूंबियांना फोन करून ही माहिती दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तांत्रिक तपासणी केली जात आहे. पोलिसांनी सविताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.