40 लाख उसने घेतलेले; भाडेकरूची हत्या करून मृतदेहाचे केले ३ तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 06:34 AM2022-12-16T06:34:33+5:302022-12-16T06:34:53+5:30

अंकित खोकरने नुकतीच आपली जमीन १ कोटी रुपयांना विकली होती.

40 lakhs borrowed; Killed the tenant and cut the body into 3 pieces | 40 लाख उसने घेतलेले; भाडेकरूची हत्या करून मृतदेहाचे केले ३ तुकडे

40 लाख उसने घेतलेले; भाडेकरूची हत्या करून मृतदेहाचे केले ३ तुकडे

Next

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे एका घरमालकाने भाडेकरूची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे धारदार शस्त्राने तीन तुकडे केले व ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

ज्याची हत्या झाली त्याचे नाव अंकित खोकर असून तो उमेश शर्मा याच्या घरात भाडेकरू म्हणून राहात होता. लखनऊ येथे तो पीएच.डी. करत होता. अंकित हा बागपतचा मूळ रहिवासी आहे. त्याने नुकतीच आपली जमीन १ कोटी रुपयांना विकली होती. त्यातील सुमारे ४० लाख रुपये त्याने उमेशला उसने दिले होते. ही रक्कम परत करू न शकलेल्या उमेशने अंकितची ६ ऑक्टोबर रोजी हत्या केली. (वृत्तसंस्था)

हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी...
मृतदेहाचे तुकडे करून ते मुझफ्फरनगर येथील एका कालवा, एक्स्प्रेस वे, मसुरी कालवा अशा ठिकाणी फेकून दिले व हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अंकितचे एटीएम कार्ड उमेशने त्याचा एक मित्र प्रवेश याला दिले व बँक खात्यातील उर्वरित रक्कम उत्तराखंड येथून काढण्यास सांगितले. अंकित दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने काही मित्रांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला प्रारंभ झाला. हत्येप्रकरणी उमेश शर्मा व प्रवेश यांना पोलिसांनी अटक केली.

Web Title: 40 lakhs borrowed; Killed the tenant and cut the body into 3 pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.