४० पोलीस घरात घुसले, बहीण आवाज देत राहिली'; वाचवा, कुणाला तरी फोन करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 03:31 PM2022-05-02T15:31:54+5:302022-05-02T15:32:34+5:30
Crime News : गुंजा वाचव, कुणाला तरी बोलव... हे शब्द चंदौलीतील गुंजा यादवचे आहेत. जी आपल्या बहिणीची आठवण करून रडते.
चंदौली : जवळपास ४० पोलीस आले होते. आम्ही त्यावेळी गच्चीवर होतो, हे लोक थेट घरात घुसू लागले. आम्ही गेट बंद करण्याचा प्रयत्न सुरू केल्यावर या लोकांनी गेट ढकलून उघडला. आम्ही विरोध केला असता त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर एका लेडीज आणि जेंट्स कॉन्स्टेबलने मला पकडले. जेव्हा दीदीने मला पाहिले तेव्हा तिने स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्या खोलीत धाव घेतली आणि दरवाजा बंद केला. मात्र, गेट उघडून तिला मारले. थोडा वेळ ती मला फोन करत राहिली. गुंजा वाचव, कुणाला तरी बोलव... हे शब्द चंदौलीतील गुंजा यादवचे आहेत. जी आपल्या बहिणीची आठवण करून रडते आहे. हिस्ट्री शीटर कन्हैया यादवच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी दोन्ही मुलींना मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे निशाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताची बहिण गुंजा हिने केला आहे.
असं करू नको, दीदीचं लग्न होणार आहे...
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. गावकरी आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली. एसएचओला निलंबित करण्यात आले आहे. मात्र, कुटुंब न्यायाची मागणी करत आहे. या घटनेने उत्तर प्रदेश पोलीस पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. घटना चंदौलीच्या मनराजपूर गावातील आहे. मृताची बहीण गुंजा कॅमेऱ्यासमोर म्हणाली, 'आम्ही पोलिसांना सांगत होतो की, असे करू नका साहेब, आमची परीक्षा आहे... दीदींचे लग्न होणार आहे. असे असूनही त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर खोलीतून आवाज येणे बंद झाले. एका हवालदाराने खाली खुर्ची नेली. मी म्हणाले, तुम्ही काय करत आहात. त्यावेळी मी त्याचा हात धरला तेव्हा मला रक्त लागल्याने झटकून दिले. त्यानंतर तो आत गेला. 5-10 मिनिटांनी सगळे बाहेर आले आणि म्हणाले, या मुलीला सोड. मग सगळे निघून गेले. तो निघून गेल्यानंतर 10 सेकंदातच आम्ही त्या खोलीत पोहोचलो. दीदी पंख्याला लटकत होती आणि जमिनीला स्पर्श करत तिचा पाय वाकले होते.
एका वाक्यात गुंजा यादव म्हणाली की, पोलीस आले तेव्हा आम्ही दोघी बहिणी होतो. त्याच लोकांनी बहिणीला मारलं... ती रडतच राहिली. जेव्हा हे लोक आम्हाला सोडून जाऊ लागले.. आम्ही पळत जाऊन पहिले तर दीदीला साडीच्या हलक्या गाठीने बांधले होते. तिचा पाय जमिनीला स्पर्श करून वाकलेला होता. एका हाताने मी गाठ सोडली, ती खूप हलकी बांधली होती. दीदीला तिथे आडवे केले होते. दुचाकीस्वाराला विनंती केली. मात्र, त्याने मोबाईल न देता पळ काढला. त्यानंतर आजीच्या मदतीने गावकऱ्यांना बोलावण्यात आले.
कल दिनांक 01/05/22 को जनपद चन्दौली के थाना सैयदराजा अन्तर्गत मनराजपुर गांव में संदिग्ध परिस्थितियों में हुई युवती की मृत्यु का प्राप्त पोस्टमार्टम रिपोर्ट एवं पुलिस द्वारा प्रचलित कार्यवाही के सम्बन्ध में #SP_Cdi का वक्तव्य👇#UPPolice@homeupgov@dgpup@Uppolice@adgzonevaranasihttps://t.co/F5yCXlHJKJpic.twitter.com/H8Q1Qa8KKa
— Chandauli Police (@chandaulipolice) May 2, 2022
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मानेजवळ ओरखडे आहेत
चंदौलीचे एसपी अंकुर अग्रवाल यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवालात घशाजवळ एक जखम आणि डाव्या जबड्याखाली छोटीशी जखम दिसून आली आहे. याशिवाय शरीरावर अंतर्गत किंवा बाहेरून कोणतीही जखम झालेली नाही. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण अज्ञात असे लिहिले आहे. व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे, व्हिसेरा पाठवला जाईल, अहवाल आल्यानंतरच याप्रकरणी कारवाई केली जाईल. मीडियामध्ये बलात्काराची चर्चा होती. मात्र, कोणत्याही अंतर्गत भागाला दुखापत झालेली नाही.