गुजरातमध्ये ४०० कोटींचं ड्रग्स जप्त; पाकिस्तानी बोटीसह ६ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 04:47 PM2021-12-20T16:47:18+5:302021-12-20T17:39:02+5:30

400 crore drugs seized in Gujarat :आंतरराष्ट्रीय बाजारानुसार याची किंमत ४०० कोटी रुपये इतकी असून सध्या अधिक तपास सुरु आहे.

400 crore drugs seized in Gujarat; 6 arrested with Pakistani boat | गुजरातमध्ये ४०० कोटींचं ड्रग्स जप्त; पाकिस्तानी बोटीसह ६ जण अटकेत

गुजरातमध्ये ४०० कोटींचं ड्रग्स जप्त; पाकिस्तानी बोटीसह ६ जण अटकेत

googlenewsNext

गांधीनगर - गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त कारवाईत तब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केले आहे. भारताच्या जल हद्दीत ६ चालकांसह पाकिस्तानी नौका ताब्यात घेण्यात आली आहे. अल-हुसैनी नावाची पाकिस्तानी नौका असून अधिकाऱ्यांना गस्त घालत असताना गुजरात किनारपट्टीजवळ ही पाकिस्तानी नौका दिसली. त्यावर असलेल्या सहा संशयितांना अटक कऱण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार याची किंमत ४०० कोटी रुपये इतकी असून सध्या अधिक तपास सुरु आहे.

गुजरात सीमेवर घुसखोरांवर करडी नजर ठेवणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या आणि एटीएसच्या संयुक्त कारवाईदरम्यान पाकिस्तानी बोट अल-हुसैनी आढळली. त्यानंतर जवानांनी तात्काळ बोटीवर कारवाई करत मुद्देमालासह ६ जणांना ताब्यात घेतले. बोटीवर असणारे सर्वजण हेरॉइनची तस्करी करणार  होते. 

एप्रिल महिन्यात अरबी समुद्राला लागून असलेल्या भारतीय सागरी सीमेवर भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एक बोट पकडली असून त्यात ८ पाकिस्तानी नागरिक होते. तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पथकाने ८ पाकिस्तानी नागरिकांकडून ३० किलो हेरॉईन जप्त केले आहे. अधिकृत माहितीनुसार, ही बोट कच्छ जिल्ह्यातील जाखू बीचजवळ पकडली गेली. भारतीय तटरक्षक दलाने काही वेळापूर्वी पकडलेल्या पाकिस्तानी आणि हिरोईनविषयी माहिती दिली होती.

आयटीजीने ट्विटरवर म्हटले आहे की, “एटीएसगुजरातबरोबर संयुक्त कारवाईत आयसीजीने भारतीय समुद्री क्षेत्रातील आयएमबीएल (आंतरराष्ट्रीय मेरीटाइम बॉर्डर लाइन) जवळ पाकिस्तानी नौका पीएफबी (पाकिस्तानी मासेमारीची बोट) पकडली,” आयसीजीने ट्विटरवर म्हटले होते. यात बोटीत ८ पाकिस्तानी नागरिक आणि ३० किलो हेरॉईन होते.

Web Title: 400 crore drugs seized in Gujarat; 6 arrested with Pakistani boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.