4000 कोटींचा पाँझी घोटाळा दडपला?; IAS विजय शंकर यांचा घरातच मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:29 AM2020-06-24T11:29:43+5:302020-06-24T11:38:18+5:30
बंगळुरू शहरी जिल्ह्याचे माजी उपायुक्त विजय शंकर यांचा मृतदेह जयानगरमधील त्यांच्या निवासस्थानी आढळला आहे.
बेंगळुरू : आयएमए पाँझी घोटाळ्याचे आरोप असलेले आयएएस अधिकारी विजय शंकर यांचा मंगळवारी रात्री राहत्या घरातच मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सीबीआयने त्यांच्यावर 4000 कोटी रुपयांच्या घोटाळा दडपण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप लावला असून यावर खटला चालविण्यात येणार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बंगळुरू शहरी जिल्ह्याचे माजी उपायुक्त विजय शंकर यांचा मृतदेह जयानगरमधील त्यांच्या निवासस्थानी आढळला आहे. आयएमए पाँझी घोटाळ्यावर पांघरून घालण्यासाठी विजय शंकर यांनी मोठ्या प्रमाणावर लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी 2019 मध्ये चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने शंकर यांना अटक केली होती.
यानंतर कर्नाटकात आलेल्या भाजपाच्या येडीयुराप्पा सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले. सीबीआयने नुकतीच शंकर आणि अन्य दोन आरोपींविरोधात खटला दाखल करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. या प्रकरणात आणखी दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी अडकलेले आहेत.
काय आहे पाँझी घोटाळा
या घोटाळ्याचा म्होरक्या मोहम्मद मंसूर खान याने 2006 मध्ये आयएणए नावाने कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी बेंगळुरुसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये काम करत होता. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना गुंतवणूक केल्यास मोठे उत्पन्न देण्याचे आमिष दाखवून फसवणूक सुरु केली. गुंतवणुकीवर 17 ते 25 टक्के व्याज देण्याचे लालच देण्यात आले. मात्र, जेव्हा लोकांचे पैसे परत करण्याची वेळ आली तेव्हा कंपनीचा मालक खान दुबईला फरार झाला. मात्र, गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याला ईडीने अटक केली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या....
India China FaceOff: पुन्हा डोकलाम? लडाखमध्ये फेल झालेल्या चीनचा नवा डाव; भूतानला जाळ्यात ओढणार
न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम
India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला
थरारक! सीएने पत्नीची हत्या केली; विमानाने सासुरवाडीला जात सासूला गोळ्या घातल्या
चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अॅप
अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला