WhatsAppवर न्यूड व्हिडीओ कॉल, ब्लॅकमेल करून ४३ लाख लुबाडले;नेमकं प्रकरण काय, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:35 PM2023-12-28T17:35:48+5:302023-12-28T17:41:38+5:30
राजस्थानमधील एका १९ वर्षीय मुलाने नवी मुंबईतील ३४ वर्षीय व्यक्तीला अनेक व्हॉट्सअॅप कॉल केले.
व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन अनेकांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला नवी मुंबई सायबर पोलिसांनी राजस्थान येथून जेरबंद केले आहे. हलीम फरीद खान (१९) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने एका फिर्यादीला अशाच प्रकारे धमकावून त्याच्याकडून ४३ लाख २२ हजार ९०० रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या फिर्यादीच्या तक्रारीवरून नवी मुंबई सायबर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी मे ते ऑगस्ट दरम्यान राजस्थानमधील एका १९ वर्षीय मुलाने नवी मुंबईतील ३४ वर्षीय व्यक्तीला अनेक व्हॉट्सअॅप कॉल केले. यावेळी दोघेही नग्नावस्थेत बोलत राहिले, जे आरोपीने रेकॉर्ड केले. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे एक एक करून त्याने पीडितेकडून ४३ लाख रुपये लुटले. त्यानंतरही तो तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. अखेर कंटाळून पीडितेने नवी मुंबईच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३८४ (खंडणी), ४२० (फसवणूक) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. ब्लॅकमेलिंग कॉल राजस्थानमधून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर लोकेशन ट्रेस करताना पोलिसांचे पथक राजस्थानच्या डीग भागात पोहोचले. पुराव्याच्या आधारे १९ वर्षीय आरोपी हमील फरीद खान याला २४ डिसेंबर रोजी राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या पालडी या दुर्गम गावातून अटक करण्यात आली होती. नवी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी सांगितले की, आरोपीने युट्यूबवर अश्लील व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देऊन तक्रारदाराकडून एकूण ४३,२२,९०० रुपये उकळले. त्याच्या ताब्यातून अनेक मोबाईल फोन, सिमकार्ड आणि एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. पीडितेचे पैसेही जप्त करण्यात आले आहेत, जे आरोपींनी विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले होते.
गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबईत लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सन २०२१मध्ये लैंगिक शोषणाचे ५४ गुन्हे दाखल झाले होते, त्यापैकी २४ प्रकरणांमध्ये ३३ जणांना अटक करण्यात आली होती. या २४ पैकी ४ प्रकरणे अशी होती ज्यात पीडितेकडून १० लाख रुपयांहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली. २०२२ मध्ये लैंगिक शोषणाचे एकूण ७७ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३० गुन्ह्यांमध्ये ५२ जणांना अटक करण्यात आली आहे. या ७७ पैकी २२ प्रकरणांमध्ये आरोपींनी पीडितेकडून १० लाखांपेक्षा जास्त रक्कम घेतली होती. काही महिन्यांपूर्वी सेक्सटोर्शन रॅकेट चालवणाऱ्यांनी मुंबईतील ७१ वर्षीय व्यावसायिकाकडून ५१ लाख रुपये उकळले होते. अशा प्रकारे टोळीचे सदस्य सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना टार्गेट करून त्यांना आपला बळी बनवतात.