रेल्वेच्या तिजोरीतून ४४ लाख गायब; पोलिसांचा तपास सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 07:17 PM2019-09-24T19:17:03+5:302019-09-24T19:18:43+5:30

सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींद्वारे या गुन्हाचा तपास सुरू केला आहे.

44 lakh robbed from lockers of LTT railway station; Police investigation started | रेल्वेच्या तिजोरीतून ४४ लाख गायब; पोलिसांचा तपास सुरु 

रेल्वेच्या तिजोरीतून ४४ लाख गायब; पोलिसांचा तपास सुरु 

Next
ठळक मुद्दे या गुन्ह्याची तक्रार एलटीटी रेल्वे स्थानकावरील मुख्य बुकिंग सुपरवायझर सुनील तेलतुंबडे यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दिली आहे. तिजोरीतून ४४ लाख २९ हजार ५०१ रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. रविवारी संध्याकाळी ४ ते रात्री १२ वाजताच्यादरम्यान ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथील प्रवाशांच्या तिकिटांचे तब्बल ४४ लाख २९ हजार ५०१ रुपये चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी ४ ते रात्री १२ वाजताच्यादरम्यान ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिकीटघर येथील लोखंडी तिजोरीतून हे पैसे चोरीस गेले आहेत. त्यामुळे ही चोरी कोणी केली याचा तपास पोलीस करीत आहे. या गुन्ह्याची तक्रार एलटीटी रेल्वे स्थानकावरील मुख्य बुकिंग सुपरवायझर सुनील तेलतुंबडे यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दिली आहे. 

एका व्यवस्थापकाने दुसऱ्या व्यवस्थापनाकडे चार्ज दिल्यानंतर, तिजोरीतून ४४ लाख २९ हजार ५०१ रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. ही घटना रात्री उघडकीस आली. याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा काही सहभाग आहे का? सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींद्वारे या गुन्हाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: 44 lakh robbed from lockers of LTT railway station; Police investigation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.