१६० सदनिकाधारकांची ४४.२५ काेटींची फसवणूक, तळोजा पोलिस ठाण्यात चार जणांसह आजी-माजी संचालकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 08:53 AM2024-01-18T08:53:49+5:302024-01-18T08:54:49+5:30

गणेश कुंदन सिंग बिष्ट हे सेक्टर १७, खारघर येथे राहत असून, २०१० मध्ये त्यांना हेक्स ब्लॉक्स प्रोजेक्ट व बिल्डरचे कार्यालय दिसले.

44.25 crore fraud of 160 flat owners, case against four persons and ex-directors in Taloja police station | १६० सदनिकाधारकांची ४४.२५ काेटींची फसवणूक, तळोजा पोलिस ठाण्यात चार जणांसह आजी-माजी संचालकांवर गुन्हा

१६० सदनिकाधारकांची ४४.२५ काेटींची फसवणूक, तळोजा पोलिस ठाण्यात चार जणांसह आजी-माजी संचालकांवर गुन्हा

नवीन पनवेल : विकासकाने १६० सदनिकाधारकांकडून ४४ कोटी २५ लाख ७१ हजार ८५ रुपये स्वीकारले. मात्र, करारनाम्यानुसार दिलेल्या मुदतीत घराचा (प्लॅट) ताबा दिला नाही. त्यामुळे सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी मनूला मेहबुल्ला काचवाला, ललित श्याम टेकचंदानी, काजोल ललित टेकचंदानी, अरुण हसानंद मखिजानी आणि आजी-माजी संचालक व इतरांविरोधात १५ जानेवारी रोजी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश कुंदन सिंग बिष्ट हे सेक्टर १७, खारघर येथे राहत असून, २०१० मध्ये त्यांना हेक्स ब्लॉक्स प्रोजेक्ट व बिल्डरचे कार्यालय दिसले. यावेळी त्यांना सुप्रीम कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक प्रोजेक्टचे बांधकाम करत असल्याचे समजले. सदनिकेची किंमत ८० लाख रुपये सांगण्यात आली.

बजेट ३० लाखांचे असल्याने त्यांनी त्यांच्याच कंपनीच्या मालकीचे रोहिंजण येथील हेक्स सिटी नावाचे बांधकाम सुरू होणार असे सांगितले. त्यांना साईटवर नेले असता, प्लॉटवर पत्र्याचे कंपाउंड व गेटवर सुप्रीम कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंटचा  बोर्ड लावलेला दिसला. तसेच बांधकामासाठी आवश्यक सरकारी परवानगी घेतल्याचे सांगितले. येथे सहा महिन्यांत बांधकाम सुरू होईल. यात एमएमआरडीएचा सहभाग असल्याचे सांगितले.

इतर आजी-माजी संचालक कोण?
हेक्स सिटी प्रकल्पात राज्यमंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते सांभाळणाऱ्या एका मोठ्या नेत्याचे नातलग भागीदार असल्याने मागेही एका  ग्राहकाच्या तक्रारीवरून पाेलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यामुळे याही गुन्ह्याचे धागेदाेरे तिथेपर्यंत असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

चुकीची माहिती देऊन दिशाभूल
२०१४ मध्ये सदनिकेचा ताबा देणार असल्याचे बिल्डरकडून आश्वासन दिले. त्यांनी सदनिका बुक केली. २०१४ ते २०१९ दरम्यान गृहकर्ज घेऊन रक्कम अदा केली. एकूण ३१ लाख २९ हजार रुपये देण्यात आले. सदनिका खरेदी करारनाम्याचे रजिस्ट्रेशन केले. बिल्डरने बांधकाम प्रकल्पाचे नाव हेक्स सिटीवरून क्लेन सिटी असे केले. मात्र प्रोजेक्ट पूर्ण केला नाही. संपर्क केला असता, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी कंपनीचे ऑफिसही बंद केले. 

या प्रकल्पात एकूण १ हजार ८०० लोकांनी सदनिका बुक केल्याचे बुकिंगधारकांकडून समजले. त्यामुळे १६० सदनिकाधारकांनी एकत्र येऊन फ्लॅट मिळण्यासाठी सुप्रीम कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे राबवण्यात येणारा प्रोजेक्टचा पाठपुरावा व त्याबाबत संघर्ष केला. त्यामुळे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: 44.25 crore fraud of 160 flat owners, case against four persons and ex-directors in Taloja police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.