४८ लाखांचे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाची कामगिरी

By अजित मांडके | Published: March 1, 2023 05:58 PM2023-03-01T17:58:12+5:302023-03-01T18:02:13+5:30

यावेळी उत्तरप्रदेशचा सुरेशकुमार दयाराम यादव आणि गुजरात येथील शैलेश मोहनभाई वर्मा या दोघांना अटक केली. 

48 lakh Indian-made foreign liquor seized; action of Thane Division of State Excise | ४८ लाखांचे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाची कामगिरी

४८ लाखांचे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाची कामगिरी

googlenewsNext

ठाणे : महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेली भारतीय विदेशी मद्य व बियर असा ४८ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाने जप्त केला असून यात भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचे ३३० बॉक्स व बियरचे ७० बॉक्स, लाकडी भुशाच्या २०० गोण्या, दोन मोबाईल व एक वाहनाचा समावेश आहे. ही कारवाई बुधवारी पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामधील खाणवेल उधवा रोड येथे केली. यावेळी उत्तरप्रदेशचा सुरेशकुमार दयाराम यादव आणि गुजरात येथील शैलेश मोहनभाई वर्मा या दोघांना अटक केली. 

पालघर जिल्ह्यातील खानवेल-उधवा रोडवरुन परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती निरीक्षक आनंदा कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार उधवा पोलीस चौकीसमोर पाळत ठेवली असता एका टेम्पोची संशयास्पद हालचालीवरून तपासणी केली, त्या टेम्पोमध्ये मोठया प्रमाणात फॉर सेल इन यु.टी.दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासीत प्रदेशामध्ये विक्रीकरीता असलेल्या व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचे 330 बॉक्स व बियरचे 70 बॉक्स मिळून आला आणि त्यावेळी दोघांना अटक केली. यावेळी एकूण ४८ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई निरीक्षक आनंदा कांबळे, दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे तसेच जवान नारायण जानकर, केतन वझे, हनुमंत गाढवे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाठ, वैभव वामन, जी. के. खंडागळे व जवान नि. वाहनचालक राजेश झापडे या पथकाने केली. दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे पुढील तपास करत आहेत.
 

Web Title: 48 lakh Indian-made foreign liquor seized; action of Thane Division of State Excise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.