खळबळजनक! शहरात ४९ तलवारींचा साठा जप्त; एका आरोपी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 04:23 PM2021-07-04T16:23:23+5:302021-07-04T16:24:20+5:30
Crime News : पुंडलिक नगर व जिन्सी पोलिसांची कारवाई: पाच दिवस पोलीस कोठडी
औरंगाबाद - तलवारी घातक शस्त्र तलवारी,कुकरी, दुधारी बाहुबली तलवारीसह ४९ शस्त्र साठा बायजीपूरा परिसरात पुंडलीकनगर,जिन्सी पोलिसांनी जप्त केला आहे. इरफान खान उर्फ दानिश याला अटक करण्यात आली आहे. पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात पुर्ण चौकशी करून तलवार विकणारे तसेच पुरवठादाराच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी दिली.
आरोपी हा सुरुवातीला तलवारी ऑनलाईन मागून त्या लग्न व इतर कार्यक्रमात किरायाने देत होता. त्याने तो विक्रीचा धंदा सुरू केला, आणि त्यातून चांगली कामे होत असल्यामुळे त्याने मोठा ऑर्डर कुरिअर कंपनीला दिला. त्यांनी शस्त्रसाठा विक्रीसाठी मागितला की अन्य कोणत्या कारणासाठी यावर पोलिस तपास करीत आहेत. त्याच्यासोबत अजून कोण सहभागी आहेत. याचीही माहिती पोलीस काढत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेद अनेकांना लागले आहे त्यासाठी तर हा शस्त्रसाठा कुणी मागितला आहे का असा प्रश्न विचारला असता उपायुक्त गिर्हे यांनी सांगितले की,सध्या त्याची सखोल चौकशी सुरू असून कुरियर च्या माध्यमातून ऑनलाइन मागितलेला शस्त्रसाठा त्याच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. कुरियर ज्या वाहनातून शस्त्र मागितले ही खबर पुंडलिक नगर पोलिसांना कळाल्यामुळे त्यांनी पकडले.
बाजीपुरा परिसरातून त्याच्या राहत्या घरात जप्त केलेली शस्त्र ४९ जप्त करण्यात आली आहे. आरोपी हा कुटुंबापासून वेगळा राहतो असून त्याच्या पत्नीसह तो वेगळा राहतो. तपासणीचे सूत्र वेगळ्या दिशेने करण्यात येत आहे. शस्त्र पाठविणे होण्यापासून ते खरेदी करणाऱ्या पर्यंत सर्वांची चौकशी केली जाणार आहे. असे उपायुक्त गिर्हे यांनी सांगितले. यावेळी पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व यावेळी जिन्सी ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे उपस्थिती होती. पाच दिवस कोठडी.. आरोपीला न्यायालयात हजर केले असता नऊ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अधिक तपास जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक केंद्रे करीत आहेत.