खड्डा चुकवण्याच्या नादात नागपूरमध्ये अनियंत्रित कारने चाैघांना चिरडले, महिला गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 06:32 AM2021-10-04T06:32:19+5:302021-10-04T06:32:47+5:30

मृतांत सख्खे बहीण-भाऊ, कार दुभाजक ताेडून थेट प्रवाशांच्या अंगावर आली आणि सर्व्हिस रस्त्यावर उलटली.

4th people was crushed by an uncontrolled car in Nagpur due to avoid pothole, a woman critically | खड्डा चुकवण्याच्या नादात नागपूरमध्ये अनियंत्रित कारने चाैघांना चिरडले, महिला गंभीर 

खड्डा चुकवण्याच्या नादात नागपूरमध्ये अनियंत्रित कारने चाैघांना चिरडले, महिला गंभीर 

Next

काेंढाळी(जि. नागपूर) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर सातनवरी येथे खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नांत अनियंत्रित कारने दुभाजक ताेडून सर्व्हिस रस्त्यालगत बसची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या पाच जणांना उडविले. यात चाैघांचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली. मृतांमध्ये सख्ख्या बहीण-भावाचा समावेश आहे. हा अपघात रविवारी दुपारी घडला.

बंडू सालवणकर (५५), चिन्नू सोनबरसे (१३), शाैर्य डोंगरे (९) व शिराली डोंगरे (६ ) अशी मृतांची नावे आहेत. ललिता सोनबरसे (५०) या गंभीर झाल्या आहेत. हे सर्वजण बसस्टाॅपजवळ बसची प्रतीक्षा करीत उभे हाेते. त्यातच अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कारने बसस्टाॅपजवळील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नांत थेट दुभाजकाला जाेरात धडक दिली. कार दुभाजक ताेडून थेट प्रवाशांच्या अंगावर आली आणि सर्व्हिस रस्त्यावर उलटली. यात पाचजण गंभीर जखमी झाले. चारजण इस्पितळात नेताना दगावले.

Web Title: 4th people was crushed by an uncontrolled car in Nagpur due to avoid pothole, a woman critically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर