बुलडोझर कारवाईच्या धास्तीनं गँगरेपचे ५ आरोपी पोलिसांना आले शरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 19:55 IST2022-04-07T19:55:17+5:302022-04-07T19:55:51+5:30
Gangrape Case :आरोपींनी त्यांच्या कुटुंबीयांसह सकाळी पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले आणि हात जोडून त्याच्या दुष्कृत्याबद्दल एसएचओ जयप्रकाश सिंह यांच्यासमोर माफी मागितली.

बुलडोझर कारवाईच्या धास्तीनं गँगरेपचे ५ आरोपी पोलिसांना आले शरण
आंबेडकर नगर (युपी) : उत्तर प्रदेशपोलिसांच्या बुलडोझरच्या कारवाईच्या भीतीने आंबेडकर नगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या पाच जणांनी गुरुवारी पोलिसांना आत्मसमर्पण केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मार्च 2022 रोजी जिल्हा आंबेडकर नगर पोलीस स्टेशन, जैतपूर परिसरातील जिउली गावात सामूहिक बलात्कार झाला होता. आरोपींनी त्यांच्या कुटुंबीयांसह सकाळी पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले आणि हात जोडून त्याच्या दुष्कृत्याबद्दल एसएचओ जयप्रकाश सिंह यांच्यासमोर माफी मागितली.
"अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या पाच आरोपींनी बुलडोझर फिरवण्याचा आणि गोळीबाराच्या आंबेडकर नगर पोलिसांच्या कठोर कारवाईच्या भीतीने जैतपूर पोलीस ठाण्यात आल्यानंतर आत्मसमर्पण केले," असे आंबेडकर नगर पोलिसांनी ट्विट केले. घटनेच्या आधी आणि दोषींची पडताळणी तसेच ओळख पटल्यानंतर, पोलिसांनी शरण न आल्यास त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याचा इशारा दिला होता.