आदिवासी पाड्यातील ५ मुले बेपत्ता, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 08:15 PM2018-09-06T20:15:37+5:302018-09-06T20:18:38+5:30
नवी मुंबई – नवी मुंबईतल्या आदिवासी पाड्यातील ५ मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. कातकरी पाडा, भीमनगर, रबाळे एमआयडीसी येथील आदिवासी पाड्यातील ५ मुले बुधवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहेत. याबाबत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. शंकर तेजवंत सिंह (वय ११), गगन तेजवंत सिंह (वय ८), अर्जुन श्रीधर ढमढेरे (वय ११), रोहित राजकुमार जयस्वाल (वय १३), अनिश कृष्णकुमार अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत.
काल दुपारी रबाळेमधील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातील हे 5 विद्यार्थी शाळेजवळ खेळत होती. दुपारी 1 वाजता अचानक ही मुलं दिसेनाशी झाली. त्यानंतर त्यांचा आदिवासी पाड्यातील सगळ्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ही मुलं कुठेही सापडली नाही. या मुलांना बेपत्ता होऊन आता अनेक तास उलटून गेले आहेत. रात्रभर वस्तीतील लोकांनी या मुलांना शोध घेतला. परंतु त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी आज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार आता पोलिसांची पथके या मुलांना शोधण्यासाठी कामाला लागली आहे.