५ कोटींचं सोनं जप्त; मुंबई विमानतळाहून 18 किलो सोने हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 02:59 PM2018-08-06T14:59:12+5:302018-08-06T15:00:10+5:30

मुंबई विमावतळावर हाँगकाँहून आलेल्या एका प्रवाशाला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी  18.3 किलोच्या सोन्याच्या तस्करी केल्याप्रकरणी केली अटक 

5 crore gold seized; 18 kg gold is seized from Mumbai airport | ५ कोटींचं सोनं जप्त; मुंबई विमानतळाहून 18 किलो सोने हस्तगत

५ कोटींचं सोनं जप्त; मुंबई विमानतळाहून 18 किलो सोने हस्तगत

Next

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर सोने आणि अमली पदार्थ तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) सोने आणि अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरु केली असून मागील काही महिन्यात कोट्यावधी रुपयांचे  सोने आणि अमली पदार्थ यांच्या तस्करीचे प्रकार  डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले आहेत. नुकतेच डीआरआयने 18.3 किलो सोन्यासह एकाला अटक केली आहे.

विमानतळावरील वाढलेली अमली पदार्थ आणि सोन्याची तस्करीमुळे सुरक्षा अधिकारी देखील जागरूक झाले आहेत. त्यामुळे मुंबई विमानतळावरील सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात येणार आहे. सोन्याच्या तस्करीसाठी आंतरराष्ट्रीय तस्करांनी बहुधा मुंबईची निवड केली असावी. मागील अनेक कारवायांमध्ये तस्करांनी बोगस कंपन्या उभ्या करून त्या कंपन्यांमध्ये मशिन्सचा व्यवहार करणाच्या नावाखाली सोन्याची तस्करी केली जात आहे. या आयात करण्यात येणाऱ्या मशिन्सतील स्क्रू किंवा इतर नटबोल्ट हे सोने वितळवून बनवून त्यावर कलर देऊन मशिनमध्ये फिट केले जातात. हा अनोखा प्रकार पुढे आल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. नुकतीच मुंबई विमावतळावर हाँगकाँहून आलेल्या एका प्रवाशाला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी  18.3 किलोच्या सोन्याच्या तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे. संगणकिय सामानातील हार्डडिक्सचे कव्हर आणि इतर प्लेट सोने वितळवून बनवून ती ओळखता येऊ नये. यासाठी चंदेरी रंग दिला होता. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी  हस्तगत केलेल्या सोन्याची किंमत ही 5 .4 कोटी इतकी आहे.

Web Title: 5 crore gold seized; 18 kg gold is seized from Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.