विविध नोकऱ्यांचे आमिष दाखवून ४५ जणांना घातला ५ कोटींचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 07:45 AM2023-02-24T07:45:47+5:302023-02-24T07:46:07+5:30

परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांसह भावावर गुन्हा

5 Crores cheated 45 people by luring them with various jobs | विविध नोकऱ्यांचे आमिष दाखवून ४५ जणांना घातला ५ कोटींचा गंडा 

विविध नोकऱ्यांचे आमिष दाखवून ४५ जणांना घातला ५ कोटींचा गंडा 

googlenewsNext

पुणे - शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून ४५ जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी शैलेजा दराडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात तब्बल पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शैलजा दराडे या सध्या राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त आहेत.

याबाबत सांगली जिल्ह्यातील ५० वर्षीय शिक्षकाने हडपसर ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) आणि शैलेजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण) यांच्यावर गुन्हा दाखल केला. शैलजा उत्तम खाडे (पूर्वाश्रमीच्या शैलजा रामचंद्र दराडे) आणि दादासाहेब दराडे हे भाऊ, बहीण आहेत. दादासाहेब याने शैलजा या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगितले. फिर्यादींच्या दोन वहिनींना शिक्षक पदावर नोकरी लावण्याची बतावणी केली आणि त्यांच्याकडून जून २०१९मध्ये २७ लाख रुपये घेतले. अशाच प्रकारे इतर ४४ जणांची लाखाे रुपयांची फसवणूक केली. शैलजा यांनी आपला दादासाहेब यांच्याशी काहीही संबंध नाही. भाऊ असल्याच्या नात्याने कोणीही त्याच्याबरोबर कसलाही व्यवहार करू नये, अशी जाहीर नोटीस ऑगस्ट २०२०मध्ये दिली होती. 

Web Title: 5 Crores cheated 45 people by luring them with various jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी