वर्षाचे उत्पन्न दाखविले ५ लाख, बँक खात्यात सापडले ६० कोटी; पाहून आयकर अधिकाऱ्यांची झोप उडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 16:48 IST2020-12-25T16:47:34+5:302020-12-25T16:48:17+5:30
Income Tax: आयकर विभागाने करचोरांविरोधात देशभरात एक अभियान सुरु केले आहे. या अभियानाद्वारे अशा लोकांची ओळख पटविली जात आहे. या लोकांना वारंवार नोटीस पाठवूनही ते आयकर अधिकाऱ्यांसमोर हजर होत नाहीएत.

वर्षाचे उत्पन्न दाखविले ५ लाख, बँक खात्यात सापडले ६० कोटी; पाहून आयकर अधिकाऱ्यांची झोप उडाली
आयकर चोरी करत असलेल्यांचा अडचणींत आता वाढ होणार आहे. आयकर विभाग एक विशेष अभियान सुरु करणार आहे. याद्वारे आयकराची चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. मुंबईच्या एका व्यक्तीने त्याचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये असल्याचे दाखविले होते. मात्र, त्याच्या खात्यात ६० कोटी रुपये जमा असल्याचे पाहून आयकर अधिकाऱ्यांचीही झोप उडाली आहे.
आयकर विभागाने करचोरांविरोधात देशभरात एक अभियान सुरु केले आहे. या अभियानाद्वारे अशा लोकांची ओळख पटविली जात आहे. या लोकांना वारंवार नोटीस पाठवूनही ते आयकर अधिकाऱ्यांसमोर हजर होत नाहीएत. हे असे लोक आहेत ज्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला परंतू तो विसंगत असल्याने व्हेरिफाय करण्यासाठी आयकर विभागाने नोटीसा पाठविल्या होत्या. आता आयकर विभागाने या लोकांना शोधणे आणि त्यांच्याकडून दंडासह कराची रक्कम वसुलण्याची मोहीम काढली आहे.
महसूल विभागाच्या सुत्रांनी सांगितले की, अनेक लोक मुद्दामहून कर परताव्याच्या नोटीसीकडे दुर्लक्ष करत असल्याचे आयकर विभागाला समजले आहे. या लोकांना ईमेल, एसएमएस आणि कागदी नोटीस पाठविण्यात आली आहे. तरीही ते आयकर विभागाला संपर्क करत नाहीएत.
आयकर विभागाला आत चकमा देणे सोपे राहिलेले नाही. आयकर विभागात आता फेसलेल असेसमेंट सिस्टीम लागू करण्यात आली आहे. मुंबईच्या एका अशा व्यक्तीची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे. या व्यक्तीने वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये दाखविले आहे, मात्र त्याच्या खात्यात 12 कोटी रुपये रोखीने जमा केलेले होते. यानंतर तपासात त्याच्या खात्यात असे 60 कोटी रुपये जमा झाल्याचे समजले. या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे सापडलेल्या डायरीत या नोंदी सापडल्याने आयकर विभागाचे अधिकारीही पाहतच राहिले होते.
असाच एक प्रकार गुतरातच्या राजकोटमध्ये उघड झाला आहे. त्यानेही वर्षाचे उत्पन्न 5 लाख रुपये दाखविले होते. मात्र, एका वर्षात त्याच्या खात्यात 10 कोटी रुपये जमा झाले आणि 7.5 कोटी रुपये काढण्यात आले. या व्यक्तीला सहा नोटीस आणि 10 एसएमएस पाठविण्यात आले होते.