5 लाख दे अन्यथा घर जाळून टाकू, पंच कमिटीच्या फर्मानमुळे दाम्पत्याने प्यायले विष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 10:45 AM2022-04-22T10:45:50+5:302022-04-22T10:47:12+5:30

चतौडगढ जिल्ह्याच्या निंबाहेडा येथील ही घटना असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे

5 lakh, otherwise we will burn down the house, the couple drank poison out of fear of the Punch Committee | 5 लाख दे अन्यथा घर जाळून टाकू, पंच कमिटीच्या फर्मानमुळे दाम्पत्याने प्यायले विष

5 लाख दे अन्यथा घर जाळून टाकू, पंच कमिटीच्या फर्मानमुळे दाम्पत्याने प्यायले विष

Next

चितौडगढ - अल्पवयीन मुलाच्या प्रेमकथेमध्ये जेव्हा पंच किमटीची एंट्री झाल्यानंतर या प्रेमकहानीला वेगळंच वळण लागलं आहे. या पंच कमिटीने तुघलकी फतवा जारी करत 5 लाख रुपयांच्या दंडाचीच शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम जमा न केल्यास घर जाळून टाकण्याची धमकीही दिली आहे. पंच किमिटीच्या या तुघलकी फर्मानमुळे युवकाचा सांभाळ करणाऱ्या काका-काकूंनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

चतौडगढ जिल्ह्याच्या निंबाहेडा येथील ही घटना असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पंच किमिटीने पुतण्याच्या प्रेम प्रकरणावरुन सुनालेल्या फर्मानमुळे गरीब दाम्पत्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काका-काकू हे पुतण्याचा आपल्या मुलासारखा सांभाळ करत होते. मात्र, पंच किमिटीने सुनावलेल्या फतव्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते. निंबाहेड़ा पोलीस ठाण्याचे एएसआय नवलराम यांनी सांगितले की, 17 एप्रिल रोजी रणजीतने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. रणजीतच्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्याने दाखल केली होती, पण 18 एप्रिल रोजी दोन्ही पक्षांमध्ये राजी-सहमती झाली होती. 

पीडित रणजीतने कान्हा मीणा, भंवरलाल मीणा आणि मोती मीणासह प्रतापगढ निवासी पिंटू मीणा व पुष्कर मीणा यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिली होती. या तक्रारीत म्हटलं होती की, पिंटू आणि पुष्कर यांना प्रतापगढ येथून बोलावले होते. या दोघांनी 5 लाख रुपये किंवा 2 एकर जमीन देण्याची धमकी दिली. तसेच, पैसे न दिल्यास घर जाळून टाकण्याचेही म्हटले होते. कलेक्टर-एसपी हे आमचं काहीच बिघडू शकत नाहीत. कारण, आम्ही आदिवासी आहोत, असेही या दोघांनी म्हटल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

काय आहे लव्हस्टोरी

पंडित रजणीत यांचा अल्पवयीन पुतण्या त्याच गावातील त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी असलेल्या युवतीसोबत प्रेम प्रकरणात गुंतला होता. 1 जानेवारी रोजी तिला घेऊन पळूनही गेला. त्यावेळी, पोलिसांनी दोघांना पकडून मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन केले. त्यानंतर, आई-वडिलांनी मध्य प्रदेशातील मनासा येथे मुलीचं लग्न लावून दिलं. मात्र, त्यानंतरही दोघांमधील प्रेम कमी झालं नाही. त्यातूनच 1 मार्च रोजी मुलगी दुसऱ्यांदा रणजीतच्या पुतण्यासोबत पळून गेली. त्यामुळे, मुलीच्या कुटुंबीयांनी रणजीतवर दबाव टाकत धमकी दिली. त्यातूनच, रणजीतने पोलिसांत तक्रार दाखल केली. 

Web Title: 5 lakh, otherwise we will burn down the house, the couple drank poison out of fear of the Punch Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.