भयंकर! एकाच कुटुंबातील ५ सदस्यांच्या पायाचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

By पूनम अपराज | Published: February 24, 2021 03:51 PM2021-02-24T15:51:34+5:302021-02-24T15:52:01+5:30

Murder in jharkhand : कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकार पूर्णपणे अपयश असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप विरोधक करतात. तर सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे की, विरोधी पक्ष कोणत्याही कारणाशिवाय स्वतःहून राजकारण करीत आहे. त्याचबरोबर, पोलिस गुन्हेगारांशी कठोरपणे व्यवहार करत आहेत.

5 members of the same family were killed by breaking their legs | भयंकर! एकाच कुटुंबातील ५ सदस्यांच्या पायाचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

भयंकर! एकाच कुटुंबातील ५ सदस्यांच्या पायाचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

Next
ठळक मुद्देमृतांमध्ये  निकोदिन तोपनो (६०), पत्नी जोसेफिन तोपनो (५५), मुलगा भीमसेन्ट तोपनो (३५), सून  सिलबन्ति तोपनो (३०), नातू अल्बिस तोपनो (५) यांचा समावेश आहे.

झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील कामदारा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या बुरुहातू गावात एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिस-प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतांमध्ये  निकोदिन तोपनो (६०), पत्नी जोसेफिन तोपनो (५५), मुलगा भीमसेन्ट तोपनो (३५), सून  सिलबन्ति तोपनो (३०), नातू अल्बिस तोपनो (५) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेमागे कारण परस्पर वाद आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. असे सांगितले जात आहे की, सर्व कुटुंबातील सदस्यांचे पाय तोडून निर्घृणपणे हत्या केली गेली. दरम्यान, कुटुंबातील सर्व जणांची एकत्र हत्या केल्यानंतर गावकरीही हत्येमागील कारण सांगण्यास टाळाटाळ करीत आहेत.

 

आकाशात उडणारं हेलिकॉप्टर पाहणे जीवावर बेतले; अचानक तोल गेला अन्... 

 



या घटनेनंतर परिसरात खळबळ 
इकडे या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण आहे आणि एकाचवेळी पाच जणांना ठार मारल्यानंतर सर्वजण दहशतीत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला असून तपासात गुंतले आहेत. विशेष म्हणजे झारखंडमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्ष सरकारवर सतत टीका करत आहेत. राज्यात सत्ता बदलल्यापासून गुन्हेगार निर्भय आहेत आणि निर्भयपणे गुन्हा करीत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

यासह, कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकार पूर्णपणे अपयश असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप विरोधक करतात. तर सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे की, विरोधी पक्ष कोणत्याही कारणाशिवाय स्वतःहून राजकारण करीत आहे. त्याचबरोबर, पोलिस गुन्हेगारांशी कठोरपणे व्यवहार करत आहेत.

 

Web Title: 5 members of the same family were killed by breaking their legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.