पॉर्न व्हिडिओ पाहिला अन् २ अल्पवयीन मुलींवर ५ जणांनी केला सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 06:44 PM2022-03-08T18:44:06+5:302022-03-08T19:16:00+5:30
Gangrape Case : या घटनेने पुन्हा आता मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलिसात नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे.
पाटणा - आज जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे महिलांच्या अब्रू लुटली जाण्याच्या घटना काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. या वाढत्या घटनांमुळे खरंच महिला इतक्या सुरक्षित आहेत का असा प्रश्न बिहारच्या या धक्कादायक घटनेने उपस्थित होत आहे. काल बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यातील बारबिघा पोलीस ठाण्याच्या परिसरात ५ अल्पवयीन मुलांनी २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने पुन्हा आता मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलिसात नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मुली शेतात भाजीपाला तोडायला गेल्या असताना ही धक्कादायक घटना घडली. यावेळी अल्पवयीन मुलांनी मुलींची अब्रू लुटली. या मुलांनी मुलींना काही पैसे दिले आणि तोंड बंद ठेवण्यास सांगितले.याबाबत कोणालाही माहिती न देण्याची धमकी त्यांनी दिली. नातेवाईकांना हे समजताच त्यांनी त्या दोन मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र ३ मुले पळून गेले. या मुली सरकारी शाळेत इयत्ता ६ वी व ७ इयत्तेत शिकत आहेत. विधी संघर्ष बालकांपैकी ३ जण ६ वीच्या वर्गात शिकत आहेत. तसेच एक विधी संघर्ष बालक ७ वीत तर दुसरा ८ वीच्या वर्गात शिकत आहे. सापडलेली दोन मुले आणि पळून गेलेली तीन मुले ही एकाच गावचे रहिवासी आहेत.
३७ लाख दे अन् निघून जा! बलात्काराच्या आरोपीकडून पोलिसाने घेतली लाच
यापैकी एक मुलगा हा मुलींच्या शेजारी राहतो असे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांनी २ जणांना पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या दरम्यान मुलांनी स्मार्ट फोनवर पॉर्न व्हिडिओ पाहून हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.
हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाचा Video Viral, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया
विधी संघर्ष बालक अल्पवयीन असल्याने सध्या ते बाल कल्याण संकुल येथे रिमांड होममध्ये आहेत. यांच्यावर कलम १६४ अंतर्गत न्यायदंडाधिकार्यांसमोर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यांच्यावर भादंवि कलम ३७६ डी, ५०६ (२), १२० (बी) आणि ११४ यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.