चष्म्यावरून ५ महिन्यानंतर पटली मृतदेहाची ओळख, पुरावे नष्ट करण्यासाठी १०० वेळा पाहिला टीव्हीवरील क्राईम शो 

By पूनम अपराज | Published: October 29, 2020 09:58 PM2020-10-29T21:58:30+5:302020-10-29T22:00:19+5:30

Murder : पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता त्याने टीव्ही शो क्राईम पेट्रोल १०० हून अधिक वेळा पाहिला होता असल्याचे आढळले. हत्येच्या घटनेच्या ५ महिन्यानंतर अल्पवयीन मुलाला ताब्यात तर आईला अटक करण्यात आली.

5 months after the spectacle, the body was identified, the crime show was watched 100 times on TV to destroy the evidence. | चष्म्यावरून ५ महिन्यानंतर पटली मृतदेहाची ओळख, पुरावे नष्ट करण्यासाठी १०० वेळा पाहिला टीव्हीवरील क्राईम शो 

चष्म्यावरून ५ महिन्यानंतर पटली मृतदेहाची ओळख, पुरावे नष्ट करण्यासाठी १०० वेळा पाहिला टीव्हीवरील क्राईम शो 

googlenewsNext
ठळक मुद्देमृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे नाव मनोज मिश्रा (४२) असे आहे. ११ वर्षीय संगीत यांच्या मुलीला तिच्या आजी आजोबांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका १७ वर्षाच्या मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आपल्या आईसोबत मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. हे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने क्राईम पेट्रोल या शोमधून काही युक्त्या मिळवल्या. पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता त्याने टीव्ही शो क्राईम पेट्रोल १०० हून अधिक वेळा पाहिला होता असल्याचे आढळले. हत्येच्या घटनेच्या ५ महिन्यानंतर अल्पवयीन मुलाला ताब्यात तर आईला अटक करण्यात आली.


मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे नाव मनोज मिश्रा (४२) असे आहे. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मुलगा १२ वीचा विद्यार्थी आहे. अल्पवयीन मुलाने हे दुष्कृत्य २ मे रोजी केले होते. वडील त्याला ओरडले म्हणून त्याने आपल्या वडिलांच्या डोक्यावर लोखंडाच्या सळईने घाव घातला. त्यानंतर वडील बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली. त्याच रात्री या मुलाने आपल्या आईच्या मदतीने मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

तो मृतदेह घेऊन घरापासून साधारण ५ किमी दूर एका जंगलात गेला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याने पेट्रोल आणि टॉयलेट क्लीनरने मृतदेह जाळून टाकला. पोलिसांना ३ मेला अंशत: जळालेला मृतदेह आढळला. तीन आठवड्यांपर्यंत या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नव्हती. कारण कोणत्याही पोलीस ठाण्यात कोणत्याही व्यक्तीची हरवले असल्याची तक्रार दाखल नव्हती झालेली. 

मृत व्यक्तीच्या कुटुंबाने इस्कॉनच्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन २७ मेला एक हरवल्याची तक्रार दाखल केली. कारण मनोज मिश्रा हे इस्कॉनमध्ये डोनेशन कलेक्टर म्हणून तेथे काम करत होते. येथील काही सहकाऱ्यांनी मनोज मिश्रा यांच्या मृतदेहाची चष्म्यावरून ओळख पटवली. इस्कॉनमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, मनोज दीर्घकाळापासून गैरहजर होते. मात्र ते अनेकदा भगवत गीतेचा प्रचार करण्यासाठी यात्रा करत असत त्यामुळे याबाबत कोणताच संशय आला नाही. पोलिसांनी जेव्हा मनोजच्या मुलाला चौकशीसाठी बोलावले तेव्हा तो बचावाचा प्रयत्न करू लागला. त्याचप्रमाणे पोलिसांना प्रश्न करू लागला ते का व कोणत्या अधिकाराने त्याची चौकशी करत आहेत. दरम्यान जेव्हा त्याचा मोबाईलची तपासणी केली गेली तेव्हा पोलिसांना कळले त्याने क्राईम पेट्रोल ही सीरिज १००हून अधिक वेळा पाहिली. अनेकदा चौकशी केल्यानंतर अखेर त्याने आपली चूक कबूल केली. पोलिसांनी या प्रकरणी ३९ वर्षीय संगीता नावाच्या आईलाही अटक केली आहे. तिच्यावर हत्या आणि पुरावे नष्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ११ वर्षीय संगीत यांच्या मुलीला तिच्या आजी आजोबांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

Web Title: 5 months after the spectacle, the body was identified, the crime show was watched 100 times on TV to destroy the evidence.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.