दोन सराईत गुन्हेगारासह ५ जणांना अटक; ९१ मोबाईल अन् औषधाच्या बाटल्या ५०२ हस्तगत
By कुमार बडदे | Updated: May 18, 2023 16:34 IST2023-05-18T16:33:19+5:302023-05-18T16:34:51+5:30
मोबाईल मधील आयएमईआय नंबर ब्रेक करणारा फैसल शेख आणि जुबेर शेख या दोघानाही पोलिसांनी अटक करुन जुबैर याच्या जवळील १६ मोबाईलही ताब्यात घेतले.

दोन सराईत गुन्हेगारासह ५ जणांना अटक; ९१ मोबाईल अन् औषधाच्या बाटल्या ५०२ हस्तगत
कुमार बडदे
मुंब्रा - मोबाईल चोरणारे, त्यातील आयएमइआय नंबर ब्रेक करणारे आणि चोरलेल्या मोबाईलची विक्री करणारा अशा एकूण पाच आरोपींना मुंब्रापोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यापैकी दोघे सराईत गुन्हेगार आहेत. अटक केलेल्या आरोपिंपैकी तिघांकडून विविध कंपन्यांचे ९१ मोबाईल आणि एका कडून नशेसाठी वापरण्यात येणा-या कपसिरपच्या ५०२ बाटल्या असा ऐकून ९ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल तसेच नंबर ब्रेक करण्यासाठी वापरण्यात येणारा लँपटाँप आणि साँफ्टवेअर पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर तसेच इतर वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थाचे सेवन आणि विक्री करणा-यांवर कारवाई करण्यासाठी गठित करण्यत आलेल्या पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे आणि त्यांच्या पथकाने नुकताच फैयाज शेख याच्या घरातून चोरी केलेले ६२ मोबाईल आणि विक्री साठी जमा करुन ठेवलेल्या कपसिरपच्या ५०२ बाटल्या ताब्यात घेतल्या. चौकशी दरम्यान त्याने दिलेल्या माहिती वरुन मोबाईल चोरणारा त्याचा सहकारी शोएब शेख उर्फ राज याला अटक करुन त्याच्याकडून १३ मोबाईल ताब्यात घेतले.हे दोघे मोबाईल चोरुन विक्री करण्यासाठी ज्याच्याकडे देत होते त्या हन्जला अंसारी उर्फ कैफ याला तसेच मोबाईल मधील आयएमईआय नंबर ब्रेक करणारा फैसल शेख आणि जुबेर शेख या दोघानाही पोलिसांनी अटक करुन जुबैर याच्या जवळील १६ मोबाईलही ताब्यात घेतले.
सर्व आरोपि मुंब्रा शहरातील विविध ठिकाणी रहातात. न्यायालयाने त्याना १९ मे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.यातील फैयाज आणि शोएब हे सराईत गुन्हेगार आहेत.त्याच्या विरोधात मुंब्रा,मुंबईतील साकिनाका या पोलिस ठाण्यांमध्ये तसेच कुर्ला आणि ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती परीमंडळ १ चे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.