अकोल्यामध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचार, वृद्धास १० वर्षांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 07:56 PM2022-11-19T19:56:44+5:302022-11-19T19:57:01+5:30
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिची पाच वर्षांची मुलगी घराजवळ खेळत असताना आरोपी यशवंत उर्फ पाशाने मेश्राम याने घरात कोणी नसताना, मुलीला घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
नितीन गव्हाळे
अकोला - घराजवळ खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलीस घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणात प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्या न्यायालयाने आरोपी यशवंत ऊर्फ पाशा अंबादास मेश्राम(६२) रा. आंबेडकर नगर, जठारपेठ याला १० वर्ष सक्तमजुरी कारावासाची शिक्षा ठोठावली.
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिची पाच वर्षांची मुलगी घराजवळ खेळत असताना आरोपी यशवंत उर्फ पाशाने मेश्राम याने घरात कोणी नसताना, मुलीला घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी रडत असल्याने, आईने तिला सांगितल्यावर, आईने सिव्हील लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३७६(२)आय,३५४(अ),१,३, ५, एम, एन, ६,८,१२ पोक्सो नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने आरोपीविरूद्ध साक्ष व पुरावे ग्राह्य मानुन आरोपी १० वर्ष सक्तमजुरीसह १० हजार रूपये दंड, न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता राजेश्वर देशपांडे यांनी बाजु मांडली.
विविध कलमांनुसार शिक्षा
आरोपीस कलम २३५(२) सीआरपीसी नुसार कलम ३ दंडनिय कलम ४ कलम ५ दंडनिय कलम ६ पोक्सो, तसेच कलम ३७६(२) मध्ये १० वर्ष सक्तमजुरी १० हजार रूपये दंड, न भरल्यास दोन महिने साधा कारावास, कलम ३५४ मध्ये ५ वर्ष सक्तमजुरी, पाच दंड, न भरल्यास एक महिना साधा कारावास, कलम ३५४ मध्ये २ वर्ष सक्तमजुरी, तीन हजार दंड, न भरल्यास १५ दिवस साधी कैद, कलम ७ दंडनिय कलम पोक्सोमध्ये ५ वर्ष सक्तमजुरी, पाच हजार रूपये दंड, न भरल्यास एक महिना साधी कैद, कलम ११ दंडनिय कलम १२ पोक्सोमध्ये २ वर्ष सक्तमजुरी, ३ हजार रूपये दंड, न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. ही शिक्षा आरोपीस एकत्र भोगावी लागणार आहे.