५ वर्षीय मुलीला निर्दयी आईनं दिले गरम चाकूचे चटके; कारण ऐकून तुम्हीही संतापाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 08:52 AM2022-07-20T08:52:37+5:302022-07-20T08:53:06+5:30

जेव्हा मुलगी जोरजोरात रडत शेजारच्या घरात गेली तेव्हाही आईनं पाठलाग सोडला नाही.

5-year-old girl stabbed with hot knife by cruel mother at UP | ५ वर्षीय मुलीला निर्दयी आईनं दिले गरम चाकूचे चटके; कारण ऐकून तुम्हीही संतापाल

५ वर्षीय मुलीला निर्दयी आईनं दिले गरम चाकूचे चटके; कारण ऐकून तुम्हीही संतापाल

googlenewsNext

गोरखपूर - उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एका सनकी महिलेनं क्रूर कृत्य समोर आले आहे. शाळेत जाण्यास नकार देणाऱ्या मुलीला गरम चाकूनं चटके दिले आहेत. आईच्या मातृत्वाला काळीमा फासणारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. ५ वर्षाच्या मुलीला गरम चाकूचे चटके दिलेत. या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठत आईविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुलीने शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या आईनं गरम चाकूने मुलीच्या हातापायावर चटके दिले. त्यामुळे मुलगी वेदनेने ओरडत राहिली. हे पाहून वडिलांनी तिला वाचवले आणि क्रूर पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत आरोपी आईला ताब्यात घेतले आहे. 

विशेष म्हणजे मुलीच्या वडिलांनी केलेल्या पोलीस तक्रारीत म्हटलंय की, कुटुंबात पत्नी आणि २ मुली आहेत. मोठ्या मुलीचं वय ५ वर्ष तर छोट्या मुलीचे वय २ वर्ष आहे. मंगळवारी सकाळी मोठी मुलगी शाळेत जाण्यास नकार देत होती. मी शाळेत जाणार नाही असा हट्ट करत राहिली. त्यामुळे रागावलेल्या पत्नी कांचनने गरम चाकूने माझ्या मुलीच्या अंगावर अनेक ठिकाणी चटके दिले. 

त्याचसोबत जेव्हा मुलगी जोरजोरात रडत शेजारच्या घरात गेली तेव्हाही आईनं पाठलाग सोडला नाही. शेजारील घरात जात चिमुकल्या मुलीला पकडून आणत चाकूचे चटके दिले. ही घटना पाहून कुणाच्याही अंगाचा थरकाप उडेल. हे दृश्य पाहून शेजाऱ्यांनी संतापलेल्या आईला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला रोखता आले नाही. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल सिंह म्हणाले की, वडिलांच्या तक्रारीनंतर आईवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. 

Web Title: 5-year-old girl stabbed with hot knife by cruel mother at UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.