मुलीला डॉक्टर बनविण्यासाठी 50 लाख गमावले; प्रवेशाच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 09:25 AM2023-03-03T09:25:13+5:302023-03-03T09:25:25+5:30

मीरा रोडच्या नया नगर भागातील अफसर व नझीर हे डॉक्टर दाम्पत्य आयशा आणि हुदा या दोन मुलींसह राहतात.

50 lakh lost to make girl a doctor; Fraud of doctor couple in the name of admission | मुलीला डॉक्टर बनविण्यासाठी 50 लाख गमावले; प्रवेशाच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याची फसवणूक

मुलीला डॉक्टर बनविण्यासाठी 50 लाख गमावले; प्रवेशाच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याची फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मीरा रोड : मुलीला नवी मुंबईतील तेरणा वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थापक कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे सांगून मीरा रोडच्या डॉक्टर दाम्पत्याची ५० लाखांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. तसेच पैसे परत मागितले असता दाम्पत्याला धमकी दिल्याप्रकरणी नया नगर पोलिसांनी बुधवारी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

मीरा रोडच्या नया नगर भागातील अफसर व नझीर हे डॉक्टर दाम्पत्य आयशा आणि हुदा या दोन मुलींसह राहतात. आयेशा ही  मुंबईच्या बीएमसी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तर लहान मुलगी हुदा हिने २०१९ मध्ये नीटची परीक्षा दिली होती. तिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी फोन येत होते. जुलै २०१९ मध्ये किरण निचिते याने फोन करून आपण मंत्रालयात बसतो. तुमच्या मुलीचे ॲडमिशन करायचे असेल, तर मंत्रालयात भेटा, असे सांगितले. अफसर भेटण्यासाठी गेल्या असता निचितेने मंत्रालयाजवळील भाजपच्या कार्यालयात त्यांना नेले. तेथे ५ वैद्यकीय महाविद्यालयांची नावे सांगून व्यवस्थापक कोट्यातील ॲडमिशनसाठी ८० लाख ते १ कोटी लागतील, असे सांगितले. 

त्याने ठाण्याच्या अल्पिन डायग्नोस्टिक सेंटर येथे त्यांना बोलावले. तेथेही अफसर व नझीर गेले. तेथे निचितेसह अखिलेश पाल होता. पाल याने तेरणा वैद्यकीय महाविद्यालयासाठी ९५ लाख, पुण्याच्या एमआयएमईआरसाठी ८० लाख व काशीबाई नवले महाविद्यालयासाठी ८५ लाख, नाशिकच्या वसंतराव पवार महाविद्यालयासाठी ९० लाख आणि मुंबईच्या के. जे. सोमय्यासाठी १ कोटी रुपये व्यवस्थापक कोट्यातून ॲडमिशनसाठी भरावे लागतील, अशी दरांची यादीच मांडली. 

अन्सारी दाम्पत्याने तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी ८० लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर रोख व आरटीजीएसद्वारे किरण निचिते, राकेश वर्मा, लव गुप्ता, राजू पाटील, गणेश, नीलेश व कश्यप यांनी अन्सारी दाम्पत्य आणि त्यांच्या नातलगांकडून टप्प्याटप्प्याने ५० लाख रुपये उकळले. ॲडमिशनचा अर्ज भरून घेतला व त्यासाठीचा धनादेशही 
घेतला. मात्र, ॲडमिशन करून 
दिली नाही.

धमकीनंतर गाठले पोलिस ठाणे
अन्सारी दाम्पत्याने पैसे मागितले असता, तुमची मुलगी सायन रुग्णालयात शिक्षण घेत आहे. तिला बघून घेऊ, अशी धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर दाम्पत्याने थेट पोलिस ठाणे गाठले. आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत. किरण निचिते हा शहापूरच्या वासिंद भागातील राहणारा आहे.

Web Title: 50 lakh lost to make girl a doctor; Fraud of doctor couple in the name of admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.