शिरूर येथे पोलीस ठाण्यातच घेतली ५० हजारांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 08:08 PM2018-10-06T20:08:55+5:302018-10-06T20:11:21+5:30

गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एकाकडून पोलीस स्टेशनमध्येच ५० हजार रुपयांची लाच घेणा-या पोलीस हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.

50 thousand bribe took place at the police station in Shirur | शिरूर येथे पोलीस ठाण्यातच घेतली ५० हजारांची लाच

शिरूर येथे पोलीस ठाण्यातच घेतली ५० हजारांची लाच

googlenewsNext
ठळक मुद्देहवालदार एसीबीच्या जाळ्यातसाक्षीदार करण्यासाठी त्यांच्याकडे १ लाख रुपयांची लाच होती मागितली

पुणे : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एकाकडून पोलीस स्टेशनमध्येच ५० हजार रुपयांची लाच घेणा-या पोलीस हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. शनिवारी दुपारी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. 
     दत्तात्रय विष्णू होले (वय ५३) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलिसांचे नाव आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय होले पोलीस हवालदार असून, शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. यातील तक्रारदार यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार १५६ (३) नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास होले करीत होता. त्यावेळी होले याने तक्रारदार यांना या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तसेच, त्यांना साक्षीदार करण्यासाठी त्यांच्याकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीकडून तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी दुपारी पोलीस अधीक्षक संदिप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा कारवाईत तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. शिक्रापूर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. 
कोणत्याही लोकसेवकाने लाच मागितल्यास पुणे लाच लुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार करण्याचे आवाहन उप अधिक्षक सुहास नाडगौंडा यांनी केले आहे. तक्रार हेल्पलाईन क्रमांक १०६४ तसेच ०२०-२६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३ या क्रमांकावर करावी. 

Web Title: 50 thousand bribe took place at the police station in Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.