धक्कादायक! कोलकात्यातील भाजपा कार्यालयाजवळ आढळले तब्बल 51 देशी बॉम्ब; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 08:20 AM2021-06-06T08:20:13+5:302021-06-06T08:23:47+5:30
51 Bombs Found Near BJP Office In Kolkata : कोलकातामधून तब्बल 51 क्रूड बॉम्ब म्हणजेच देशी बॉम्ब जप्त करण्यात आल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली - देश कोरोना व्हायरससारख्या महभयंकर संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधून (Kolkata) तब्बल 51 क्रूड बॉम्ब म्हणजेच देशी बॉम्ब जप्त करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोलकातामधील एका चौकाजवळ बॅगमध्ये 51 देशी बॉम्ब सापडले. याबाबतची माहिती मिळताच बॉम्ब निष्क्रीय करण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झाले. धक्कादायक बाब म्हणजे जिथे बॉम्ब आढळले ती जागा भाजपा कार्यालयाच्या जवळच (Crude Bombs Near BJP Office) आहे.
भाजपा कार्यालयाजवळ सापडलेले हे सर्व बॉम्ब देशी बॉम्ब असून कमी तीव्रतेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत सर्व बॉम्ब निष्क्रीय केले गेले आहेत. कोलकाता पोलिसांच्या अँटी राऊडी सेक्शनने हे बॉम्ब जप्त केले आहेत. याआधीही पश्चिम बंगालमध्ये अनेकदा बॉम्ब आढळून आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल अन्य कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भाजपा कार्यालयाजवळ इतक्या मोठ्या संख्येने बॉम्ब सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Based on the input shared by the Military Intelligence, Anti Rowdy Section of Kolkata Police recovered 51 bombs from Hastings crossing area, near BJP Party office: Sources#WestBengalpic.twitter.com/zubooIg7vm
— ANI (@ANI) June 5, 2021
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी देखील मोठ्या प्रमाणात बॉम्ब सापडले होते. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भांगर परिसरातून पोलिसांनी जवळपास 200 गावठी बॉम्ब जप्त केले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. तर त्या आधीही दक्षिण 24 परगणा येथे गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यात भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याचाही मृत्यू झाला होता आणि पाच कार्यकर्ते हे जखमी झाले होते. त्यानंतर भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप देखील केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : "कोरोनाचे संकट हे भाजपा सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं संकट"; खासदाराचं वादग्रस्त विधानhttps://t.co/F8WrIFRUS4#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#ShafiqurRahmanBarqpic.twitter.com/pNxqnAuVt5
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2021