"स्वप्नातल्या राजकुमाराने दिला धोका", केली 33 लाखांची फसवणूक; महिलेची कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 11:06 AM2023-03-26T11:06:01+5:302023-03-26T11:07:11+5:30
51 वर्षीय महिलेने तिच्या प्रियकरावर 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
एका 51 वर्षीय महिलेने तिच्या प्रियकरावर 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. महिलेचे म्हणणे आहे की, प्रियकराने आपल्या आईच्या कॅन्सरच्या उपचाराच्या नावावर तिच्याकडून पैसे घेतले होते. पैसे परत मिळावेत म्हणून महिलेने प्रियकराविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे. ब्रिटनमध्ये ही घटना घडली आहे. 51 वर्षीय एलिसन वुड 44 वर्षीय उमित सुकूच्या प्रेमात पडला होती.
2018 मध्ये दोघे एका पबमध्ये भेटले होते. सुकूला भेटल्यानंतर, एलिसनला वाटले की तिला तिच्या स्वप्नातील राजकुमार सापडला आहे. पण ती चुकीची ठरली. व्यावसायिक बॉक्सर असलेल्या सुकूने तिच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.जेव्हा एलिसनला उमित सुकू विवाहित असल्याचं कळले तेव्हा तिला धक्का बसला. त्याने तर, तिला स्वतःला घटस्फोटित आहे असं म्हटलं आहे. सुकूवरच्या प्रेमामुळे ती त्याला पैसे देत राहिली.
द मिररच्या वृत्तानुसार, एका दिवशी सुकूने आईच्या कॅन्सरच्या उपचाराच्या नावावर एलिसनकडून तब्बल 12 लाख रुपये घेतले. पण परत विचारल्यावर तो विलंब करू लागला. याला कंटाळून एलिसनने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि प्रकरण कोर्टात पोहोचले. ऑक्टोबर 2020 मध्ये, न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना सुकूला अॅलिसनला 6 लाख रुपये परत करण्याचे आदेश दिले.
सर्व काही माहीत असूनही मी अनभिज्ञ राहिलो आणि पैसे देत राहिल्याचे महिला सांगते. कारण सुकूवर माझं खूप प्रेम होतं. मला त्याच्यासाठी सर्व काही करायचे होते. पण तो फक्त फायदा घेत होता असं महिलेने सांगितलं. या घटनेला दोन वर्षे उलटली तरी ती अजून यातून सावरली नाही. आता या घटनेची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"