नालासोपाऱ्यात ५५ लाखांचे ५१० ग्रॅम हेरॉईन जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 06:35 PM2022-11-30T18:35:01+5:302022-11-30T18:35:25+5:30
- मंगेश कराळे नालासोपारा :- शहरातील पूर्वेकडील परिसरात मंगळवारी रात्री ५५ लाखांचे ५१० ग्रॅम हेरॉईन या अंमली पदार्थांसह आरोपीला अटक करण्यात ...
- मंगेश कराळे
नालासोपारा :- शहरातील पूर्वेकडील परिसरात मंगळवारी रात्री ५५ लाखांचे ५१० ग्रॅम हेरॉईन या अंमली पदार्थांसह आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुन्हा नालासोपारा शहरात मिळाल्याने खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. यापूर्वीही अनेक वेळा नालासोपारा शहरात अंमली पदार्थ सापडले आहेत.
मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात अंमली पदार्थ विक्री व तस्करी करणाऱ्यांनाविरुध्द कडक कारवाई करुन पायबंद करणे बाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष- ३ विरारचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार, आचोळे रोड, फायरब्रिगेड जवळील रोडवर आरोपी संजय विश्वकर्मा (२८) याला ताब्यात घेऊन झडती घेतली. आरोपीकडून त्याचे कब्जात ५१० ग्रॅम वजनाचे ५५ लाख रुपये किंमतीची हेरॉईन नावाचा अंमली पदार्थाची हलक्या चॉकलेटी रंगाची पावडर तस्करी करीत असतांना मिळुन आला आहे. आरोपी विरुध्द आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
१) आरोपीला अटक करून चौकशी व तपासासाठी आचोळे पोलीस ठाण्यात दिले आहे. आरोपीला बुधवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - प्रमोद बडाख (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट तीन)