अकोल्यात बायोडिझेेलच्या ५४ हजार लीटर अवैध साठ्याचा भांडाफोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 07:59 PM2021-12-23T19:59:29+5:302021-12-23T20:02:12+5:30

Crime News : ५४ हजार लीटर बायोडिझेल, ट्रकसह इतर साहित्य, असा एकूण १ कोटी २६ लाख ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

54,000 liters of illegal stock of biodiesel busted in Akola! | अकोल्यात बायोडिझेेलच्या ५४ हजार लीटर अवैध साठ्याचा भांडाफोड!

अकोल्यात बायोडिझेेलच्या ५४ हजार लीटर अवैध साठ्याचा भांडाफोड!

googlenewsNext
ठळक मुद्दे एक कोटी २६ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त:स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई

अकोला: मलकापुर शेतशिवारातून येवताकडे जाणाऱ्या रस्त्या लगत असलेल्या शेत सर्वे नं.७४ मध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेल्या ५४ हजार लीटर बायोडिझलचा स्थानिक गुन्हेशाखेने बुधवारी २२ डिसेंबर रोजी भांडाफोड केला. कारवाईत पोलिसांनी ५४ हजार लीटर बायोडिझेल, ट्रकसह इतर साहित्य, असा एकूण १ कोटी २६ लाख ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्या विरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन मुख्य आरोपी अजुनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय अनुप राठी याने प्रसन्न अजय तापडीया याच्याकडून मलकापुर शेतशिवारातील शेत सर्वे क्र. ७४ भाडेत्त्वावर घेवून तेथे बायोडिझेलची अवैध सावठवणूक केली होती. दोघांनीही मजुर लावून बायोडिझेलची अवैधरित्या विक्री सुरू केल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी पुरवठा निरीक्षक जॉकी सिद्धार्थ डोंगरे यांच्या सोबत पथकातील पोलीस अमंलदारांच्या मदतीने शेत सर्वे क्र. ७४ मध्ये छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी १ कोटी २६ लाख ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात पोलिसांनी रोहन नंदु बिटनी (वय२० वर्षे, रा. येवता रोड शिवनी द्वारा लॉन मलकापुर), शेख समीर शेख हसन (वय २२ वर्षे, रा. राहुल नगर शिवणी), जावेद हुसेन सफदर हुसेन (वय ४२ वर्षे, रा. पोळा चौक, जुने शहर अकोला), जयहिंद ज्ञानोबा सानप (वय.४० वर्षे, रा. दैठना ता. परळी जि.बिड, हल्ली मुक्काम एक रुम नं. ए २४ कळंबोली सेक्टर नं. २ कळंबोली नोड रायगड) यांना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

या प्रकरणातील आरोपी प्रसन्न अजय तापडीया आणि अभय अनुप राठी हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण करीत आहेत.

Web Title: 54,000 liters of illegal stock of biodiesel busted in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.