वेश्याव्यवसायासाठी ५४१ महिलांची तस्करी; गेल्या वर्षभरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 07:43 AM2021-09-29T07:43:07+5:302021-09-29T07:44:59+5:30

तस्करीचे गुन्हे मात्र घटले. सध्या हिंदी चित्रपट, मालिका, जाहिराती, वेबसिरिजमध्ये काम मिळवून देण्याचे स्वप्न दाखवून मुलींची मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसायासाठी तस्करी.

541 women trafficked for prostitution over the past year pdc | वेश्याव्यवसायासाठी ५४१ महिलांची तस्करी; गेल्या वर्षभरातील घटना

वेश्याव्यवसायासाठी ५४१ महिलांची तस्करी; गेल्या वर्षभरातील घटना

googlenewsNext
ठळक मुद्दे तस्करीचे गुन्हे मात्र घटले.सध्या हिंदी चित्रपट, मालिका, जाहिराती, वेबसिरिजमध्ये काम मिळवून देण्याचे स्वप्न दाखवून मुलींची मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसायासाठी तस्करी

मनीषा म्हात्रे
मुंबई : चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषाबरोबरच सध्या हिंदी चित्रपट, मालिका, जाहिराती, वेबसिरिजमध्ये काम मिळवून देण्याचे स्वप्न दाखवून मुलींची मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसायासाठी तस्करी केली जात आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी राज्यातून ६० अल्पवयीन मुलींसह ५५१ महिलांची सुटका करण्यात आली. यात धक्कादायक बाब म्हणजे ५४१ जणींची वेश्याव्यवसायासाठी तस्करी केल्याचे समोर आले आहे. 

एनसीआरबीने २०२० च्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात मानवी तस्करीचे १ हजार ६५१ गुन्हे दाखल झाले असून, यात ४ हजार ७०९ मुली आणि तरुणींचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे मानवी तस्करीत महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे ४४ अल्पवयीन मुलींसह ५५० महिलांची तस्करी केल्याची नोंद आहे. तर, विविध कारवाईतून सुमारे ५५१ जणींची सुटका करण्यात आली आहे. सुटका केलेल्यांमध्ये ५२१ भारतीय महिलांसह ४ नेपाळ, १६ बांगलादेशी तरुणींचा समावेश आहे. यात वेश्याव्यवसायासाठी ५४१ जणांची तस्करी केल्याची माहितीही समोर आली आहे. 

कुंटणखान्यापासून सुरू झालेले सेक्स रॅकेट बॉलिवूडपर्यंत पसरल्याचे गुन्हे शाखेने वेळोवेळी केलेल्या कारवाईतून समोर येत आहे. देश-विदेशासह भारतातील खेड्यापाड्यातून अनेक तरुणी मायानगरी मुंबईतील बॉलिवूडच्या झगमगत्या चंदेरी दुनियेचे आकर्षण, मॉडेलिंग क्षेत्रात करिअर, अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येतात खऱ्या. पण यामागचे वास्तव या दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर समोर येते. यात नवोदित कलाकार सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसून येत आहेत. मुंबईत स्वत:ची  वेगळी ओळख निर्माण करण्याच्या नादात या तरुणी सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अस्तित्वच हरवून जात आहेत. त्याचाच फायदा दलाल मंडळी उठविताना दिसत आहेत. हायप्रोफाईल राहणीमान सांभाळत, स्वतःचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी नाईलाजास्तव किंवा स्वेच्छेने त्या वेश्याव्यवसायात अडकत आहेत. 

महाराष्ट्रासोबत तेलंगणची आघाडी
गेल्या दोन वर्षात मानवी तस्करीच्या दाखल गुन्ह्यात घट झाली आहे. २०१८ मध्ये ३११ वर असलेला आकडा २०२० मध्ये १८४ वर आला आहे. मानवी तस्करीच्या दाखल गुन्ह्यात महाराष्ट्राबरोबर तेलंगणा(१८४) ची आघाडी कायम आहे. 

वेळीच सतर्क व्हा...
मुलींनी कुठल्याही फसव्या आमिषांना बळी पडू नये. तसेच ओळखीच्या व्यक्तींवरही विश्वास ठेवण्यापूर्वी खातरजमा करणे आवश्यक आहे. पालकांनीही आपली मुलगी काय करते, याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Web Title: 541 women trafficked for prostitution over the past year pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.