सुसाईड बॉम्बर बनून मागितली ५५ लाखांची खंडणी; बॅंक यंत्रणेची उडाली भंबेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 12:41 PM2021-06-05T12:41:01+5:302021-06-05T12:47:11+5:30
Suicide Bomber : पोलीस यंत्रणेची तारांबळ
वर्धा : बॅंकेतील कर्मचाऱ्याच्या हाती पत्र देऊन सुसाईडबॉम्बची धमकी देत तब्बल ५५ लाखांची खंडणी व्यक्तीने मागितल्याने बॅंक प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. ही घटना सेवाग्राम येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखेत शुक्रवारी घडली. त्यानंतर सेवाग्राम पोलिसांनी मध्यरात्री या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
याेगेश प्रकाश कुबडे रा. सानेगुरुजीनगर बॅचलर रोड आर्वीनाका असे अटक केलेल्याचे नाव आहे. योगेश काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्याने बनावट सुसाईड बॉम्ब कमरेला लावून बॅंकेतील कर्मचाऱ्याच्या हातात पत्र देत ५५ लाख रुपये द्या अन्यथा बॉम्ब अॅक्टीव्हेट केला असल्याचे सांगितले. जीव वाचवायचा असेल तर पैसे द्या, असे त्याने पत्रात लिहिले होते. मात्र, पोलीस दिसताच त्याने पळ काढला असता बॅंकेतील इतर कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.