अटकेपूर्वी रियाच्या १९ तासांच्या चौकशीत विचारले होते ५५ प्रश्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 04:38 AM2020-09-16T04:38:22+5:302020-09-16T06:23:28+5:30

चौकशीत रियाने सुशांतसाठी ड्रग्ज मागिवल्याच्या कबुलीखेरीज अन्य एकही आरोप मान्य केले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रियाला आठ सप्टेंबरला दुपारी अटक करण्यापूर्वी सलग तीन दिवस तिची चौकशी केली.

55 questions were asked during Riya's 19-hour interrogation before her arrest! | अटकेपूर्वी रियाच्या १९ तासांच्या चौकशीत विचारले होते ५५ प्रश्न!

अटकेपूर्वी रियाच्या १९ तासांच्या चौकशीत विचारले होते ५५ प्रश्न!

googlenewsNext

- जमीर काझी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या अटकेपूर्वी एनसीबीने तिला तब्बल ५५ प्रश्न विचारले होते. सलग तीन दिवस जवळपास १९ तासांच्या चौकशीतील प्रश्नावलीचा जबाब नोंदवून घेतला. तो तपशील ‘लोकमत’ला मिळाला.
चौकशीत रियाने सुशांतसाठी ड्रग्ज मागिवल्याच्या कबुलीखेरीज अन्य एकही आरोप मान्य केले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
रियाला आठ सप्टेंबरला दुपारी अटक करण्यापूर्वी सलग तीन दिवस तिची चौकशी केली. एकूण १९ तासांच्या चौकशीदरम्यान ड्रग्ज, वित्तपुरवठा, सुशांतसह युरोपमधील सहल, त्याचा ईमेल आणि सोशल मीडियातील अकाउंटचे पासवर्ड आदी माहिती विचारली. सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थांचे विक्रेते झेड विलात्र, कैझान, अब्दुल बासित परिहार आणि अन्य काहींबाबत तिला प्रश्न विचारले. भाऊ शोविकची सुशांतशी केव्हा आणि कशी भेट घडवून आणली, याबद्दलही विचारणा करण्यात आली.
रियाने सुशांत २०१६ पासून अंमली पदार्थांचे सेवन करीत होता असे सांगितले. तू त्याला त्यापासून परावृत्त का केले नाहीस, उलट तू ड्रग्ज घेत नसताना त्याच्यासाठी ते मिळविण्याची खबरदारी का घेत होतीस? या प्रश्नावर तिने समाधानकारक माहिती दिली नाही. त्याच वेळी तिला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत १८ जणांना अटक
‘ड्रग्ज कनेक्शन’ उघड झाल्यानंतर, एनसीबीने आतापर्यंत रिया, शोविकसह एकूण १८ जणांना अटक केली. सोमवारी अटक केलेल्या शोविक चक्रवर्तीचा मित्र सूर्यदीप मल्होत्रा याच्या तपासावर भर देण्यात येत आहे. बॉलीवूडमधील अनेकांच्या तो संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. अन्य अटक तस्करांकडूनही सखोल माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: 55 questions were asked during Riya's 19-hour interrogation before her arrest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.