गहाळ झालेले लाखोंचे ५६ मोबाईल फोन नागरिकांना परत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 05:52 PM2024-05-08T17:52:48+5:302024-05-08T17:53:40+5:30
नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवाशांचे मोबाईल फोन मिसिंग/गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते.
मंगेश कराळे
नालासोपारा :- विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिसिंग व गहाळ झालेले १० लाख ७१ हजारांचे ५६ मोबाईल फोन पोलिसांनी बुधवारी नागरिकांना पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात परत केले आहे.
नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवाशांचे मोबाईल फोन मिसिंग/गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने वरिष्ठांनी या मोबाईल फोनचा शोध घेणेबाबतत सुचना दिल्या होत्या. दिलेल्या सूचना आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गहाळ मिसिंग मोबाईलचा तपास हाती घेतला होता. हे मोबाईल फोन बुध्दी कौशल्याने व तांत्रीक माहितीचे आधारे विश्लेषण करुन वेगवेगळ्या राज्यामधून तसेच महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून १० लाख ७१ हजार ७९९ रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे ५६ मोबाईल फोनचा शोध घेऊन घेतला. गुन्हे प्रकटीकरण पथकाला हे मोबाईल फोन प्राप्त झाल्यावर नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे यांचे मार्गदर्शनाखाली नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन कोतमिरे, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, पोलीस हवालदार किशोर धनु, हिरालाल निकुंभ, प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटूलकर, प्रेम घोडेराव, नामदेव ढोणे, साहिल शेख यांनी केली आहे.