मुंबईत ५.७७ कोटींची विदेशी सिगारेट जप्त; समुद्रमार्गे चिंचेच्या बॉक्समधून होती तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 08:24 AM2023-12-29T08:24:03+5:302023-12-29T08:28:44+5:30
मुंबई डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील न्हावा शेवा पोर्टवरुन निषिद्ध असलेल्या वस्तूंची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे
मुंबई - बॉलिवूड नगरी मुंबई हे व्यापाराचे मोठे केंद्र आहे. म्हणून, देशाची आर्थिक राजधानी मुंबई असल्याचं सर्वपरिचीत आहे. व्यापारासह गुन्हेगारी जगतातही मुंबईचा दबदबा आहे. अंडरवर्ल्ड आणि अंमली पदार्थांची मोठी विक्री मुंबईतूनच होते. हिंदी सिनेमात दाखवल्याप्रमाणे समुद्रमार्गे अशा वस्तूंची तस्करीही केली जाते. मुंबईतील जवाहरलाल नेहरु बंदरातून गुप्तचर विभागाच्या पथकाने तब्बल ५.७७ कोटी रुपयांची सिगारेट हस्तगत केली आहे. समुद्रमार्गे ही विदेशी सिगारेट भारतात आणण्यात आली होती.
मुंबई डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील न्हावा शेवा पोर्टवरुन निषिद्ध असलेल्या वस्तूंची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. या बंदरावरील एका संशियत कंटेनरमधून चिंचाच्या बॉक्समध्ये ही विदेशी सिगारेट लपवून आणण्यात आली होती.
Based on intelligence developed by the Directorate of Revenue Intelligence (DRI), Mumbai, a 40-feet refrigerated container that arrived at Jawaharlal Nehru Port was held at one of the Container Freight Stations (CFS) at Nhava Sheva. A thorough examination revealed that cigarette… pic.twitter.com/SJU7taGuEO
— ANI (@ANI) December 29, 2023
चिंचाचे हे बॉक्स ४० फूट रेफ्रिजरेटेड कंटेनरमधून न्हावा शेवा येथील कंटेनर फ्रेट स्टेशन (CFS) वर उतरवण्यात आले होते. DRI च्या सखोल तपासणीत असे आढळले की, सिगारेटच्या काड्या मोठ्या चतुराईने चिंच असलेल्या पुठ्ठ्याच्या पेट्यांमध्ये दडवून ठेवल्या होत्या. या सिगारेटच्या बॉक्सवर चिंच झाकण्यात आली होती. त्यामुळे, पुठ्ठ्याचे बॉक्स उघडल्यानंतरही सिगारेटचे बॉक्स दिसून येतन व्हते. दरम्यान, पथकाने जप्त केलेल्या तस्करीच्या सिगारेटची बाजारभालवाप्रमाणे अंदाजे किंमत ५.७७ कोटी रुपये आहे. तर, तब्बल ३३,९२,००० सिगारेटच्या काड्यांचा यात समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी डीआरआय विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.