मृत महिलेच्या नावावर लाटले ५८ लाख; भूमाफियांना सरकारलाच गंडवलं 

By नितीन पंडित | Published: November 9, 2022 06:16 PM2022-11-09T18:16:51+5:302022-11-09T18:17:01+5:30

भिवंडीत मुंबई वडोदरा महामार्गातील आणखी एक घोटाळा श्रमजीवी संघटनेने केला उघड

58 lakhs in the name of the deceased woman; The land mafia has messed up the government itself | मृत महिलेच्या नावावर लाटले ५८ लाख; भूमाफियांना सरकारलाच गंडवलं 

मृत महिलेच्या नावावर लाटले ५८ लाख; भूमाफियांना सरकारलाच गंडवलं 

Next

भिवंडी - मुंबई वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागी बनावट शेतकरी उभे करून सुमारे १२ कोटी रुपये लाटण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून एका वयोवृद्ध मयत आदिवासी महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा मोबदला बनावट महिला उपविभागीय अधिकारी कार्यालयात उभी करून तब्बल ५८ लाखांचा मलिदा लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाधित आदिवासी महिला ही २०११ मध्येच मयत असून तिच्या जागी ज्या आदिवासी महिलेला पैसे घेण्यासाठी उभं केलं होतं. 

तिच्या नावे भिवंडी उपविभागीय कार्यालयाने सुमारे ३२ लाख रुपये परत करण्याची नोटीस बजावल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे भिवंडी तालुक्यातील दुगाड येथील मयत ठकी सख्या सवर या महिलेची मौजे दुगाड येथील शेतजमीन सर्व्हे क्रमांक १२०/३ /५ तसेच १२०/३ अ असे मिळून एकूण ३०००  चौरस मीटर क्षेत्र बाधित होत असल्याचे शासकीय कागदपत्रांवरून सिद्ध झाले .परंतु ठकी सवर ही आदिवासी वृद्ध महिला २० एप्रिल २०११ मध्येच मयत झालेली दुगाड ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे.असे असतानाही काही भुमाफियांनी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयात २ मे २०१८ रोजी या मयत महिलेच्या जागी भागीरथी मुकणे या वृद्ध महिलेस उभे करून तीच ठकी सवर असल्याचे भासवून मोबदला मिळणे कामी प्रकरण सादर केले.त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने ६ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकरण मंजूर करून ठकी सवर हिच्या नावे प्रत्येकी दोन्ही प्लॉट मिळून ६४ लाख ९२ हजार २१८ रुपये मंजूर करून त्यापैकी १० टक्के रक्कम कपात करून मयत ठकी सवर हिच्या नावे उघडण्यात आलेल्या बनावट बँक खात्यात ५८ लाख ४२ हजार ९९६ जमा करण्यात आले.

या प्रकरणात भूमाफियांनी मयत ठकी या महिलेच्या जागी गावातील भागीरथी मुकणे या वयोवृद्ध महिलेस प्रांत कार्यालयात उभे करून ठकी च्या नावे बनावट बँक खाते उघडण्यात आले तर भागीरथी या महिलेच्या फोटोचा वापर करून प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे बनवली.
या जमिनीचा मोबदला दिल्या नंतर उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या तपासणीत सदर सर्व्हे क्रमांक १२०/३/५ हा दुबार नोंदविला गेला असल्याने रद्द करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी २९ ऑगष्ट २०२२ रोजी मयत ठकी सवर हिच्या नावे नोटीस बजावून दिले गेलेले ३२ लाख ४६ हजार १०९ रुपये शासनास परत करण्या बाबत नोटीस बजावली .सदरची नोटीस भागीरथी मुकणे हिचा नातू किरण सुनील मुकणे या नातवाच्या हाती पडली .आपली जमीन नसून आपण पैसे घेतलेले नसताना आपल्याला नोटीस का म्हणून भयभीत झालेल्या किरणने गावातील श्रमजीवी संघटनेचे कातकरी घटक जिल्हा प्रमुख जयेंद्र गावित यांना हा प्रकार सांगितला असता त्यांनी या बाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाढपुरावा घेतला असता हा बनाव उघडकीस आला आहे.

या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आल्याने संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली असून बनावट व्यक्तीस उभी करीत असताना आदिवासी अज्ञानी महिलेचा आधार घेऊन शासकीय रक्कमेचा अपहार केला असून संबंधितांना नोटीस बजावल्या असून या प्रकरणी योग्य ती कारवाई करून लवकरच गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी बुधवारी दिली आहे .

Web Title: 58 lakhs in the name of the deceased woman; The land mafia has messed up the government itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.